Homeताज्या बातम्या

बाबुराव पोटभरे यांचा ‘संघर्ष योद्धा’ पुरस्काराने होणार गौरवकृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सत्कार

माजलगाव : वंचित, पीडित आणि शोषित समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तब्बल 38 वर्षांपासून सातत्याने संघर्ष करणारे बहुजन नेते तथा बहुजन विकास मोर्

शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा आज रास्तारोको
पुरुषोत्तमपुरी गोदापात्रात बुडणार्‍या भाविकास वाचवले; जवानांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार
‘राष्ट्रीय दर्जा’ मिळवण्यासाठी आवश्यक निकष काय आहेत? जाणून घ्या नागपूर बाजार समितीची वैशिष्ट्ये!


माजलगाव : वंचित, पीडित आणि शोषित समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तब्बल 38 वर्षांपासून सातत्याने संघर्ष करणारे बहुजन नेते तथा बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. बाबुराव पोटभरे यांना त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक कार्याची दखल घेत ‘संघर्ष योद्धा’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराची घोषणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
बाबुराव पोटभरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीच्या माध्यमातून वंचित, पीडित आणि शोषित घटकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठवत सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रदीर्घ संघर्षाची दखल घेत त्यांना ‘संघर्ष योद्धा’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात उपसभापती श्रीहरी (नाना) मोरे यांच्या उपस्थितीत बाबुराव पोटभरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी (नाना) मोरे, कचरू (तात्या) खळगे, नवनाथ (अण्णा) धाईजे, प्रदीप पट्टेकर, लेखापाल उद्धव फपाळ, सांख्यिकी अधिकारी मोतीराम चव्हाण, निरीक्षक सुनील सवणे, कोषपाल मीनानाथ मुळे, वरिष्ठ लिपिक अमोल आगे, प्रतवारीकार अतुल होके, नाईक शेख रहीम यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS