गाफील राहू नका

Homeताज्या बातम्यासंपादकीय

गाफील राहू नका

मागील दोन वर्षांपासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने पुन्हा एकदा वर डोके काढले आहे. सध्या देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्णसंख्येत वाढ होत असल्या

प्रजासत्ताकापुरते प्रजासत्ताक
अतिवृष्टीचा प्रकोप आणि तापमानवाढ
काँगे्रसला गळती !

मागील दोन वर्षांपासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने पुन्हा एकदा वर डोके काढले आहे. सध्या देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे कोरोनाच्या नियमाचे पालन करणे क्रमप्राप्त. देशावर असलेले कोरोनाचे सावट अद्याप दूर झाले नाही. कोरोनाबाबतची भीती कायम असून आता पुन्हा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढत होत असून गेल्या आठवड्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले. ऐवढंच नाही तर साप्ताहिक संसर्ग दरही वाढला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता केंद्र सरकार सतर्क झाले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आता सतर्क राहणे स्वतःच्या फायद्याचे होणार आहे. सध्या कोरोना रुग्णाची सर्वाधिक वाढ तामिळनाडूमध्ये झाली आहे. मागच्या आठवड्यात राज्यातील कोरोना संसर्गाचं प्रमाण 5.2 टक्क्यांवरून 7.8 टक्क्यांवर पोहोचले होते. महाराष्ट्रात, 27 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 2,471 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 3 जून रोजी संपलेल्या आठवड्यात ही संख्या 4,883 इतकी होती. याशिवाय, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये या कालावधीत साप्ताहिक संसर्गाच्या प्रकरणांमध्येही मोठी वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांची वाढ लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले. हे आता सर्व जनतेने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलं होतं. राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हिटी 1.59 टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हिटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये 27.92 टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात 18.52 टक्के 68.75 टक्के इतकी वाढ झाली आहे. तज्ञ्जांच्या मते, कोरोना व्हायरस चाचणीला भारतात अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे. 125 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात अशा पद्धतीने कोरोना व्हायरसचे स्क्रिनिंग आणि नमुने तपासले जाणं हे पुरेसं नाही. कधी परदेशात न गेलेल्या तसंच कधी कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते.
देशभरात हजारो लोकांना या क्षणी व्हायरल ताप आणि खोकला असल्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तवला आहे. ज्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लक्षणं नाहीत, त्याची तपासणी गरजेची नाही. पण ज्या कुणालाही सतत ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर अशा सगळ्यांची तपासणी होणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. कोरोना व्हायरसची चाचणी फार वेगळी नाही. इतर रॅपिड डायग्नोस्टिप्रमाणेच यासाठी नमुने घेऊन त्याची चाचणी केली जाते. जिल्हास्तरीय रुग्णालयतही ही चाचणी केली जाते. कोरोनाचे लक्षणे दिसत असतील तर कुणीही गाफील राहू नका हा सल्ला. 

COMMENTS