सर सलामत तो पगडी पचास

Homeताज्या बातम्यासंपादकीय

सर सलामत तो पगडी पचास

 रायगडच्या खोपोली येथे पहाटे साडे सहा वाजता वेगात येणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर संथ वाहतुकीत अडकलेल्या अनेक वाहनांन

चांद्रयानमुळे अवकाश खुले
नीरज चोप्राचे निर्भेळ यश
विरोधासाठी व्यापार्‍यासह राजकिय नेते लक्ष्य

 रायगडच्या खोपोली येथे पहाटे साडे सहा वाजता वेगात येणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर संथ वाहतुकीत अडकलेल्या अनेक वाहनांना धडकल्याने चार जण जागीच ठार तर सात जण जखमी झाले असल्याची गंभीर घटना घडली. महाराष्ट्रात दररोज अपघातामध्ये अनेक लोकांना आपला प्राण गमवावा लागतो. प्रामुख्याने खराब रस्ते, नियमांचे पालन न करणे, निष्काळजीने वाहने चालवणे यामुळे सरासरी आपल्याकडे अपघात होतात. अपघातात दिवसोंदिवस वाढ होत असल्याचे चित्र असून राज्यातील आणि देशातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाय योजना केल्या जातात. रोजचे वाढते अपघात हि एक मोठी समस्या आहे.
तसे जगभरातच वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढणारे आणि चिंताजनक झालेले आहे. मद्य प्राशन करून वाहने चालवणे, अधिकवेळ ड्रायव्हिंग करणे, तुफान वेगाने गाड्या पळवणे, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न वापरणे ही अपघाताची प्रामुख्याने महत्त्वाची कारणे आहेत. या संबंधाने केलेले नियम वाहन चालवणार्‍यांनी पाळले आणि पोलिसांनी हे नियम न पाळणार्‍यांवर कडक कारवाई केली तर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. परंतु आत्ताच्या काळात सर्वसामान्य माणूसच बेदरकार आणि बेफिकिर व्हायला लागला आहेत. शक्यतो नियम न पाळणे हे मोठे पराक्रमाचे लक्षण मानले जायला लागले आहे. त्यातल्या त्यात १५ ते २९ वर्षे वयोगटातील तरुणांचे अपघात जास्त होतात. नियम धुडकावून लावणे आणि तुफान वेगाने गाड्या चालवणे हे याच वयोगटातल्या तरुणांचे लक्षण असते. शहरामध्ये तरुणवर्ग धूमस्टाईल दुचाकी पळवतांना आपण सर्वचजण पाहत असतो. सुसाटपणे गाड्या पळवण्याला ब्रेक लागावा यासाठी मागील काही वर्षांपूर्वी रोडब्रेकर मोठ्या प्रमाणावर रस्त्यात निर्माण करण्यात आले होते. मात्र या रोडब्रेकरमुळे देखील रस्ते अपघाताचे प्रमाण वाढल्याचे कारण समोर आले होते. त्यामुळे रस्त्यावरील रोडब्रेकर काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
आज मंगळवार १५ फेब्रवारी २०२२ रोजी पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात भीषण अपघात. या भीषण अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला असून एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली. यात ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने कारचा चुराडा झाला. यात ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने पाच वाहनांचा अपघात घडला. पाच वाहनांचा अपघातात कंटेनरने पुढे जाणा-या स्वीफ्ट कारला धडक दिली. स्वीफ्ट कार तिच्या पुढे जणाऱ्या आयशर टेम्पोला मागून धडकली. टेम्पोने तिच्या पुढील वेन्यू कारला जोरदार धडक दिली. या अपघातात स्वीफ्टमधील चारही प्रवासी जागीच ठार झाले तर टेम्पोने धडक दिलेल्या कारमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले. टेम्पोची धडक बसलेल्या वेन्यू कारने पुढे जाणा-या कंटेनरला जोरदार धडक दिली. मात्र हा कंटेनर पुढे निघून गेला. असा हा विचित्र अपघात झाला आहे. रस्त्यावर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने ठोस धोरण आखण्याची गरज आहे. रस्त्यावरील खड्डे हे एक अपघाताचे प्रमुख कारण आहे. रस्त्यावरील खड्ड्याने आजपर्यत लाखो लोकांचे जीव घेतलेले आहेत. त्यामुळे रस्ते खड्डेमुक्त करण्याची जबाबदारी शासनाने उचलणे काळाची गरज आहे. वाहनधारकाने नियमांचे पालन करत वाहने चालवल्यास रस्ते अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांनी लवकर निघून वेळेवर पोहचणे गरजेचे आहे. त्यांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, ‘सर सलामत तो पगडी पचास’

COMMENTS