पश्चात्ताप अहंगडाचा!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

पश्चात्ताप अहंगडाचा!

पहाट हा शब्द आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक अर्थांनी लोकप्रिय आहे. पहाटे लवकर उठल्याने आरोग्य चांगले राहते, भावगीतात तर पहाटे-पहाटे मला जाग आली, अशा गी

नगरमध्ये चार ठिकाणी दरोडे, लाखो रुपयांचा ऐवज लुटला
कोयना प्रकल्पग्रस्तांचे 21 मार्चपासून पुन्हा बेमुदत ठिय्या आंदोलन
कोपरगाव शहरासाठी 20 लाखाचे जिम साहित्य ःआ. आशुतोष काळे

पहाट हा शब्द आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक अर्थांनी लोकप्रिय आहे. पहाटे लवकर उठल्याने आरोग्य चांगले राहते, भावगीतात तर पहाटे-पहाटे मला जाग आली, अशा गीतांतील गुलाबी संदेश, पहाटेचे चालणे, गावाकडे सुनालेकी आजही पहाटे उठून आपल्या दिनचर्येची सुरूवात करतात. खरं सांगायचं तर पहाट ही सगळ्या अंगानी गुणी म्हणजे चांगली! पण, दोन वर्षांपूर्वी पहाट या शब्दाचा भावार्थ बदलला! हा शब्द काहीसा राग किंवा किळस येणारा ठरला. मात्र, आता हा शब्द पश्चात्तापाचाही पर्याय ठरतोय. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र झोपेतच होता, अशा भल्या पहाटे राज्याचे प्रथम हाऊस असणाऱ्या राजभवनात काही लोकांनी भेट दिली. अर्थात एवढ्या भेटीवरच हा प्रश्न निभावला असता तर काही हरकत नव्हती. झाले मात्र भलतेच. पहाटे-पहाटे खोटं बोलू नये, असा आपल्याकडे शिरस्ता आहे. हा परंपरागत शिरस्ता मोडत राजभवनावर एक शपथविधी झाला. हा शपथविधी तत्पूर्वी राज्याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या दोन पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन घेतला. कधीकाळी कोण्या राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या परंतु, सध्याच्या काळात राज्याचे नामधारी प्रमुख असणाऱ्या संवैधानिक पदांवर असणाऱ्या राज्यपालांनी थेट शपथविधी केला. या शपथविधीनंतर महाराष्ट्रात आणि मराठी भाषेत पहाट या शब्दाचा संदर्भ बदलला. लोकांना ती पहाट विश्वासघाताची प्रतिक वाटू लागली. प्रचंड राजकीय उलथापालथ सादर करणाऱ्या या पहाट’ला बदनामीची एक कलंकित किनार लागली.‌ असं केवळ आम्ही म्हणत नाही, तर दस्तुरखुद्द त्या पहाटे अक्षरशः मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना त्या पहाटेच्या घटनेचा पश्चात्ताप झालाय. त्यांनी स्वतः तसे बोलून दाखवले. माजी मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तिला झालेला हा पश्चात्ताप केवळ व्यक्तिचा नव्हे तर ते ज्या संघ संस्कारांतून आणि संघटनेतून आले त्या सर्वांचा हा प्रातिनिधिक पश्चात्ताप आहे. मी पुन्हा येईन’, अशी वल्गना करित सत्ता आपल्या कवेत असल्याचा बाणा अनुभवणाऱ्या फडणवीसांची त्याच सत्ता संकल्पनेने पहाटे पुरती फजिती केली. फडणवीस यांच्या सोबत अजित पवार यांचा दुसऱ्यांदा असा जिव्हाळायुक्त संबंध आला. मात्र, त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला असा कोणताही पश्चात्ताप झाला नाही, जो फडणवीस आणि त्यांच्या संघ परिवाराला झाला. आपण इतरांचा केवळ वापर करू शकतो, ही घमेंड संघ परिवारातून आलेल्या व्यक्तिची असू शकते! परंतु, राजकारण आणि एकूणच भारतीय समाज किती बुध्दिमान आहे, याची झलक फडणवीस यांना आता जाणवते. बुध्दिमान भारतीय आपला कसा वापर करू शकतात, याची झलक त्यांना जी दिसली, तीच त्यांच्या पश्चातापाचे कारण बनली आहे!  त्यांचा पश्चात्ताप हा केवळ पश्चात्ताप नसून परंपरागत ज्ञानाची मिरासदारी मिरवणाऱ्या जातीचाही अहंगड उतरवणारा पश्चात्ताप आहे!  एकंदरीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होणारा पश्चात्ताप हा व्यवस्थेचा पश्चात्ताप आहे. कारण, भारतीय समाजात जातीव्यवहाराची जी संकल्पना आहे, राजकारण हे लोकांच्या आधारावर अवलंबून असते, ही वस्तुस्थिती डोळेझाक केली तर काय फळ मिळते याची आता पुरेतो खात्री झाली असावी, असा आमचा कयास आहे! अर्थात, यात सत्तेची धुंद नेहमी असणाऱ्या महाराष्ट्राची रूलिंग कास्ट म्हणून कधीकाळी वावरणाऱ्यांना देखील आता आपण स्वतः च्या सामर्थ्यावर सत्तेत येऊ शकत नाही, याची सबक आजी माजी उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांनाही स्पष्ट झाले असावे. थोडक्यात काय तर महाराष्ट्र ही प्रबोधनाच्या विचारांची खाण आहे, इथे पश्चात्ताप करण्याइतपत लोकांना फसवलेलं कधीही खपणारे नाही, हेच खरे.

COMMENTS