Homeताज्या बातम्यासंपादकीय

काॅंग्रेस सोबतचे शीतयुद्ध…! 

राजकीय स्थित्यंतरे : भाग - ३

 राजकीय पक्षांनी सत्तेचा सातत्याने दुरुपयोग केल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांविरोधात सुरू केलेल्या कारवाईतून दिसते. मोदींनी आज

संविधान आणि कामगार!
देणाऱ्याची झोळी दुबळी !
निवडणूकीचे संकेत देणारा अर्थसंकल्प ! 

 राजकीय पक्षांनी सत्तेचा सातत्याने दुरुपयोग केल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांविरोधात सुरू केलेल्या कारवाईतून दिसते. मोदींनी आजपर्यंत झालेल्या भ्रष्टाचारांच्या फायली अशा पद्धतीने उघडल्या की, देशातील सर्वच पक्षांच्या पायाखालची माती सरकली. सामान्य जनतेपर्यंत लाभ पोहचू देण्यात किंवा लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केलेही असतील; परंतु, ते प्रयत्न जनतेपर्यंत पोहचले नाहीत, हे सत्य आहे. मोदी सत्तेने भ्रष्ट नेत्यांच्या दोऱ्या आवळणं, हे सर्वसामान्य जनतेला भावले. यामुळे कदाचीत त्यांची सत्ता दीर्घकाळ देशावर बिनधोक नांदली असती; परंतु, आता तसे म्हणता येत नाही. कारण, याच सत्तेच्या काळात देशात  महागाईचा आगडोंब उसळला, तरूणांच्या फौजा रोजगाराच्या शोधात दिशाहीन केल्या जात असल्याचा आरोप आता देशातून चौहुबाजूंनी होत आहे. देशाच्या अनेक भागात गेल्या काही वर्षांत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न भयावह पध्दतीने वाढल्याचे अनेक अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यातच भारत भूकेल्यांच्या पातळीवर जगात बराच अव्वल स्थानी आला आहे. समाजा-समाजातील तेढ वाढली आहे. अशा परिस्थितीत काॅंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष भाजपविरूध्द काही धडपड करताना दिसताहेत. परंतु, त्यांची धडपड केविलवाणी ठरते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  परिस्थिती केविलवाणी म्हणण्याचे कारण असे की, २०१९ च्या निवडणुकीपूर्वी देखील काँग्रेसच्या नेतृत्वात एक राजकीय आघाडी निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु, काँग्रेसने आपली ताठर भूमिका सोडली नाही. प्रादेशिक पक्षांचा संघर्ष मुख्यत्वे काँग्रेस विरोधातच राहिला असल्याने, त्यांचे एकत्रिकरण किंवा आघाडी बनू शकली नाही! परिणामी २०१९ च्या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात अँटि इंकंबनस्सी, हे तत्व असतानाही ते मागच्यापेक्षा आणखी अधिक मतांनी आणि जागांनी विजयी झाले. खरे तर, हा देशातील सर्वच राजकीय पक्षांना जसा धक्का होता, तसा भारतीय जनमानसाला देखील ते एक कोडे आणि आश्चर्य ठरले होते. उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे दोन ताकदवर पक्ष एकत्र आल्याने, भाजपाचा २०१९ च्या निवडणुकीत पराभव होईल, हे अनेकांनी गृहीत धरले होते. परंतु, प्रत्यक्षात जेव्हा निकाल हाती आले, तेव्हा, समाजवादी पक्ष भुईसपाट झाला होता, तर, बहुजन समाज पक्षाला लोकसभेच्या किमान दहा जागा मिळाल्या होत्या. सपा – बसपा युतीने उत्तर प्रदेश मध्ये भाजपाचे समीकरण पूर्णपणे बिघडेल, असे वाटत असतानाच निवडणुकांचे निकाल हाती आल्यावर या धारणेला जोराचा धक्का बसला. याचे कारण, काँग्रेसची शक्ती क्षीण झाली होती, तरीही अखिल भारतीय पातळीवर काँग्रेसच्या मतांची टक्केवारी आजही टिकून आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे सात टक्के मतदान आहे. सपा आणि बसपाने  जर आपल्या युतीमध्ये काँग्रेसलाही समाविष्ट करून घेतले असते, तर, उत्तर प्रदेशचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पूर्णतः वेगळा राहिला असता. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांनी काॅंग्रेस ला पुरते घेरलेले होते. राष्ट्रवादी ची काॅंग्रेस पक्षाबरोबर आघाडी असली तरी, या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये एकप्रकारचे शीतयुद्ध सतत सुरू असते. त्यांच्या आपसी संघर्षाचा अविभाज्य परिणाम म्हणून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात मोठा झाला. तो नेमका कसा यावर उद्याच्या भागात वाचा.

COMMENTS