Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतुलशास्त्री भगरे गुरुजींनी प्रत्येक युगातील ब्राह्मणत्वाचा गौरवशाली प्रवास उलगडला !परशुरामांच्या व्यक्तिमत्त्वात पराक्रमाबरोबर ज्ञान, मातृभक्ती आणि धर्मरक्षणाची वृत्ती -अतुलशास्त्री भगरे गुरुजी

नांदेड : परशुरामांच्या व्यक्तिमत्त्वात पराक्रमाबरोबर ज्ञान, मातृभक्ती आणि धर्मरक्षणाची वृत्ती होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध् शस्त्र आणि शास्त्

तेजोत्सवात उद्या ज्ञानपर्व : अतुल शास्त्री भगरे गुरुजींचे व्याख्यान, उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते उद्घाटन
सत्यशोधन पत्रकारितेचा गौरव : सुनील जोशी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
संभवामि युगे युगे नृत्याविष्काराने नांदेडकर मंत्रमुग्ध

नांदेड : परशुरामांच्या व्यक्तिमत्त्वात पराक्रमाबरोबर ज्ञान, मातृभक्ती आणि धर्मरक्षणाची वृत्ती होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध् शस्त्र आणि शास्त्र यांचा अनोखा मिलाफ होता असे मत प्रख्यात प्रवचनकार अतुलशास्त्री भगरे यांनी नांदेड येथील श्री परशुराम तेजोत्सव कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात व्यक्त केले. अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी प्रत्येक युगातील ब्राह्मण या विषयावर प्रभावी, अभ्यासपूर्ण आणि चिंतनशील भाषण केले. चारही युगांतील ब्राह्मण समाजाची भूमिका, त्यांचे कर्तृत्व, त्याग आणि मूल्यव्यवस्था यांचा त्यांनी पौराणिक संदर्भांसह वेध घेतला.
या कार्यक्रमास महामंडलेश्वर महंत सुधीरदास,  आमदार बालाजी कल्याणकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, संपादक शंतनू डोईफोडे तसेच नाशिक येथील भरतनाट्यमच्या गुरु सोनाली करंदीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुनील जोशी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले, तर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. दीपक कासराळीकर यांना ‘अभिव्यक्ती धुरंदर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच गुरु सोनाली करंदीकर यांचाही शहाजी उमाप यांच्या हस्ते सन्मान झाला. यानंतर ’संभवामी युगे युगे’ हा प्रभावी नृत्याविष्कार नाशिक येथील नृत्याली भरतनाट्यम कला अकादमीच्या प्रमुख गुरु सोनाली करंदीकर व त्यांच्या शिष्यांकडून सादर करण्यात आला. संपूर्ण सभागृह हा नृत्याविष्कार पाहून मंत्रमुग्ध झाले.  त्रेतायुगातील राजा जनक, सीता आणि रावण यांच्या कथांद्वारे त्यांनी अहंकाराचे दुष्परिणाम स्पष्ट केले. स्त्रीचा अवमान करणार्‍या सामर्थ्यवान व्यक्तीलाही पतनाला सामोरे जावे लागते, असे सांगत नारीपूजा म्हणजे स्त्रीचा सन्मान हा संदेश त्यांनी दिला. द्वापारयुगातील सुदामा आणि श्रीकृष्ण यांच्या मैत्रीचा दाखला देत त्यांनी स्वाभिमान, भक्ती आणि समाधानाचे महत्त्व पटवून दिले. संपत्तीपेक्षा मनःशांती मोठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कलियुगातील ब्राह्मणांची षट्कर्मे म्हणून अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह, यजन आणि याजन यांचा उल्लेख करून समाजप्रबोधनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. कुटुंबसंस्कार, मातृ-पितृसेवा, संस्कृतीरक्षण आणि सद्वर्तन यांमधूनच समाज उन्नत होईल, असा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या भाषणास श्रोत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळा

COMMENTS