नांदेड : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित श्री परशुराम तेजोत्सव कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार सुनील जोशी यां

नांदेड : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित श्री परशुराम तेजोत्सव कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार सुनील जोशी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजहित, निर्भीड लेखन आणि सत्यशोधन पत्रकारितेतील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, नाशिक येथील महामंडलेश्वर सुधीरदास महंत, प्रख्यात प्रवचनकार अतुलशास्त्री भगरे गुरुजी, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, कार्यक्रमाचे संयोजक तथा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर तसेच भरतनाट्यम गुरु सोनाली करंदीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सुनील जोशी यांनी दीर्घकाळ पत्रकारितेत कार्य करताना सामाजिक प्रश्न, प्रशासनातील त्रुटी, ग्रामीण भागातील समस्या, शिक्षण, शेतकरी, पाणीटंचाई, भ्रष्टाचार आणि जनतेच्या दैनंदिन अडचणींना सातत्याने वाचा फोडली आहे. त्यांच्या लेखणीत तथ्यांची अचूकता, भाषेतील संयम, अभ्यासपूर्ण मांडणी आणि जनसामान्यांप्रती असलेली बांधिलकी यांचा सुंदर संगम दिसून येतो. सत्तेला प्रश्न विचारत समाजमनाचा आवाज बनणार्या त्यांच्या पत्रकारितेचा हा सन्मान म्हणजे मूल्यनिष्ठ वृत्तलेखनाचा गौरव मानला जात आहे.

COMMENTS