Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देहरे परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर मनमाड रोडवरील देहरी परिसरातील एका घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली याबाबतची माहिती

BREAKING: तहसीलदार अर्चना पागिरे यांचा अपघात की हत्येचा प्रयत्न…???? पहा Lok News24
वापरलेले मेडिकल साहित्य चक्क फेकले रस्त्याच्या कडेला
पाठीत खंजीर खुपसणार्‍यांनी पूजा न करण्याची नैतिकता पाळावी

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर मनमाड रोडवरील देहरी परिसरातील एका घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली याबाबतची माहिती अशी की नगर मनमाड रोडवरील ढेरे परिसरात रात्रीच्या वेळी घरातील लोक झोपलेले असताना 40 वर्षीय निसार शेख या इसमाने घरात प्रवेश करून अल्पवयीन मुलीस उठवून त्याची छेड काढून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळेस मुलगी मोठ्याने ओरडल्याने घरातील लोक जागे झाल्याने निसार शेख वसंत पसार झाला. याबाबतची मिळालेली माहिती अशी की नगर मनमाड रोडवरील देहरी परिसरात राहणार्‍या एका आदिवासी कुटुंबाच्या घरात सर्व लोक झोपलेले असताना निसार शेख हा घरात घुसला त्याने अल्पवयीन मुलीला उठवण्याचा प्रयत्न करून तिची छेड काढली असता ती मोठ्याने ओरडली त्यावेळी मुलीच्या घरचे जागे झाल्याने मुलीच्या आईने तिच्या मुलीला सोडवण्याचा प्रयत्न केला असता निसार शेख यांनी मुलीचा आईचा हात फिरवून तिला ढकलून तिथून पलायन केले याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन आपली कैफियत मांडली यावरून एमआयडीसी पोलिसांनी निसार शेख यास ताब्यात घेतले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

COMMENTS