Homeताज्या बातम्याअहमदनगर

राजूरच्या तरूणाची ‘एटीएस’कडून चौकशीपाकिस्तानी गँगस्टरशी सोशल मीडियावर संपर्कात असल्याचा संशय

अकोले : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याच्या संशयावरून अकोले तालुक्यातील राजूर येथील एका तरूणाच

गुणवंत विद्यार्थी पूर्वा जाजूचा सत्कार
कै. पिचड यांचे जलव्यवस्थापनातील योगदान उल्लेखनीय : डॉ. शिंदे
कौशल्याधारित शिक्षणामुळे उज्ज्वल भविष्य : आ. लहामटे  

अकोले : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याच्या संशयावरून अकोले तालुक्यातील राजूर येथील एका तरूणाची महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने  बुधवारी (13 मे) चौकशी केली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधित तरूणाला ताब्यात घेऊन दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. मात्र, प्राथमिक तपासात ठोस आक्षेपार्ह माहिती न मिळाल्याने त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, एटीएसने बुधवारी राज्यभर मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबवित विविध शहरांमध्ये एकाचवेळी कारवाया केल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरूणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानस्थित गुन्हेगारी नेटवर्कविरोधात ही मोहीम सुरू करण्यात आल्याचे समजते.राजुर येथील संबंधित तरूणाचे काही सोशल मीडिया व्यवहार संशयास्पद असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार एटीएसचे पथक सकाळी राजुर येथे दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने संबंधित तरूणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याच्या मोबाईल फोनसह सोशल मीडिया अकाउंट्स, डिजिटल व्यवहार आणि संपर्कांची तपासणी करण्यात आली.तपास यंत्रणांकडून विशेषतः पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या कथित ‘डोगर गँग’शी संबंधित सोशल मीडिया संपर्कांची माहिती गोळा केली जात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील काही तरूणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बुधवारी मुंबई, ठाणे, पुणे, नालासोपारा, मिरारोड, नागपूर, अकोला, नांदेड, नाशिक, जळगाव यांसह विविध शहरांमध्ये एटीएसने तपास मोहीम राबविली. काही संशयितांच्या सोशल मीडिया अकाउंट्सची पडताळणी करण्यात येत असून डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असून सध्या दुबईतून आपले नेटवर्क चालवत आहे. सोशल मीडियावर प्रसिध्दी आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या मोहात काही भारतीय तरूण त्याच्या संपर्कात येत असल्याचे समोर आले आहे. या माध्यमातून कट्टरतावाद, हेरगिरी तसेच गुन्हेगारी कारवायांसाठी तरूणांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS