Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक खरातच्या जीवाला धोका : दमानिया

मुंबई : राज्यात चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात नवा वळण आले असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या जीवाला गंभीर धोका असल्याची

पुणे पोलिस दलातील लाचखोरीवर पोलिस आयुक्तांचा संताप
ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा : घोगरे 
शेवगावमध्ये महिलांना चाकूच्या धाकावर लुटण्याचे प्रयत्न; कारवाईची मागणी; नागरिकांचे पोलिसांना निवेदन


मुंबई : राज्यात चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात नवा वळण आले असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या जीवाला गंभीर धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. प्रकरण दडपण्यासाठी काहीही घडू शकते, त्यामुळे त्याला तुरुंगात विशेष सुरक्षा द्यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
दमानिया म्हणाल्या की, जर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र आले असेल, तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे अशोक खरात याच्याही जीवाला धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरातने स्वतःच तुरुंगातून बाहेर येणार नाही, माझ्याबाबत काही अनिष्ट घडू शकते, असे विधान केले आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे, असे त्यांनी नमूद केले. खरात प्रकरण मिटवण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जाऊ शकतो, अशीही शक्यता दमानिया यांनी व्यक्त केली. या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती खरातकडे असू शकते. त्यामुळे तो बाहेर येऊ नये, यासाठी त्याच्या जीवाला धोका निर्माण केला जाऊ शकतो. एखादे प्रकरण दडपण्यासाठी टोकाचे पाऊल उचलले जाण्याची भीती आम्हाला वाटते, असे त्या म्हणाल्या. राज्यात अलीकडे भोंदू बाबांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याकडे लक्ष वेधत, अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा नेमके काय करत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणार्‍या विशेष तपास पथकाकडे बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, हा धोका माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात तसेच पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणातील घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, खरातच्या सुरक्षेबाबत प्रशासन कोणते पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS