Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उन्हाचा पारा वाढु लागल्याने गुजरातच्या मातीचे माठ विक्रीसाठी दाखल  

जळगाव प्रतिनिधी -  मार्च महिन्याचा दुसरा आठवडा संपला आहे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागलेला आहे उन्हा पासून बचाव करण्यासाठी नागरिक रसाळ फळ

संकटाला तोंड देऊन यश खेचून आणता आले पाहिजे :आमदार शिरसाठ
विद्युत भवनात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना  अभिवादन
देशात तिसर्‍या आघाडीची शक्यता नाही ः पटनाईक

जळगाव प्रतिनिधी –  मार्च महिन्याचा दुसरा आठवडा संपला आहे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागलेला आहे उन्हा पासून बचाव करण्यासाठी नागरिक रसाळ फळ तसेच थंडगार पाणी ची मागणी करित आहे  तर गरिबा घरचे फ्रिज समजले जाणारे मातीचे माठ विक्रीसाठी आता बाजारात दिसू लागलेले गुजरात येथील माती पासून तयार केलेले लाल माठ बिहार चे नागरिक शिरपूर येथे विक्रीसाठी आलेले आहेत त्या ठिकाणाहून जवळच्या परिसरातील गावात व तालुक्यात डोक्यावर माठ घेऊन गल्लोगल्ली विक्रीसाठी फिरत आहे गेल्या वर्षी माठाला कमी भाव होता परंतु सर्वच वस्तूंचे भाव वाढ झाल्याने यावर्षी लाल माठ देखील भाव वाढ झालेले आहे येण्या जाण्याच्या खर्च तो देखील वाढलेला आहे त्यामुळे माठ ची किंमत वाढल्याने  ग्राहक देखील खरेदी करताना भाव करीत असतात परंतु जर परवडत असेल तर देतो नाहीतर कसं काय द्यायचं असाच प्रश्न  विक्रेत्यांनी केला त्यामुळे वाढणाऱ्या महागाईचा झळ सर्वसामान्यांना बसत आहे त्यामुळे उकडणाऱ्या उन्हापासून बचाव करण्यासाठी गरिबा घरचे फ्रिज ची किंमत वाढल्याने गरिबांना देखील घेण्यासाठी विचार करावा लागत असल्याचं या किमतीवरून दिसून येते परंतु परराज्यातील नागरी  गुजरात येथून माल घेऊन विक्रीसाठी येत असल्याने त्यांना देखील नागरिकांना भाव कमी जास्त करण्यासाठी बरेच तोंड द्यावे लागत आहे. 

COMMENTS