Homeताज्या बातम्या

बालमटाकळी येथील पाणीपुरवठा कर्मचारी यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

https://www.youtube.com/watch?v=J8gJV9di3j4 बालमटाकळी ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून जी गावाची चाळीस वर्षे मी सेवा केली ती सर्

जालापूरमध्ये नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर अतिक्रमण; गायरान जमिनीत अडथळा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे आदेश
डोक्यात फरशी घालून पित्याची हत्या; मारेकरी मुलगा जेरबंद ; राहात्यातील घटना 
कळसंबरच्या सुपुत्राची उत्तुंग भरारी! अंकुश तांगडे यांची ‘पोलीस उपनिरीक्षक’ पदी निवड; गावात जल्लोषाचे वातावरण!

बालमटाकळी ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून जी गावाची चाळीस वर्षे मी सेवा केली ती सर्वांनी मला सहकार्य केले म्हणूनच केली ‘ 40 वर्षात अनेक सरपंचाची सेवा करायला भेटली यातच मी समाधान मानतो असे भाउक उद्गार पाणीपुरवठा कर्मचारी एकनाथ शिंदे यांनी काढले ,

शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा विभागात गेल्या 40 वर्षापासून काम करीत असणारे एकनाथ शिंदे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सापत्नीक सन्मान करण्यात आला ,
यावेळी ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक मोहनराव देशमुख , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथी राजपुरे , लोकनियुक्त सरपंच डॉक्टर राम बामदळे , उपसरपंच सर्जेराव घोरपडे , माजी उपसरपंच तुषारभाऊ वैद्य , हरिश्चंद्र घाडगे , ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देशमुख , विक्रम बारवकर , दिलीप भोंगळे , शाम राजपुरे , अमोल बामदळे , संदिप शिंदे , धनुभाऊ देशमुख , गजानन देशमुख , मकबुलभाई शेख , ग्रामसेवक सुनील काळे , क्लार्क सतीश खेळकर , काकासाहेब गलधर ‘लाला पौळ आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

COMMENTS