भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड नगर परिषदेचे माजी सभापती आणि महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. श्री. नवनाथ (अण

भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड नगर परिषदेचे माजी सभापती आणि महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. श्री. नवनाथ (अण्णा) शिराळे पाटील यांनी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती लावत नववधू-वरांना भावी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
गंगाखेड तालुका, जिल्हा परभणी येथील गोदावरी मंगल कार्यालयात सामाजिक विकास समितीच्या गंगाखेड तालुका अध्यक्षा मुक्ता कराड ताई साहेब यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून शिराळे पाटील यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले. यावेळी बीड नगर परिषदेचे माजी नगरसेवक बाबुराव परळकर यांची उपस्थिती होती. त्यानंतर माजलगाव येथे घोरड परिवाराच्या शुभमंगल विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवनाथ शिराळे पाटील यांनी नवदांपत्याला सुखी, समृद्ध आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी जिल्हा परभणी येथील तरोडा गावातील हरिभक्त परायण, वेदशास्त्र संपन्न श्रीमद् भागवत कथाकार ह.भ.प. श्री विजय गुरुदेव महाराज नाकाडे तरोडेकर तसेच ह.भ.प. दिलीप देव नाकाडे तरोडेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. तरोडा येथील प्रसिद्ध श्री भगवान महारुद्र हनुमान मंदिरात जाऊन श्री हनुमान महाराजांचे दर्शन घेतले. तसेच परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध पोखरणी येथील श्री भगवान नरसिंह मंदिरात भेट देऊन भगवान नरसिंहांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सर्वत्र समाधानकारक पाऊस पडावा, शेतकरी व सर्व नागरिक सुखी-समृद्ध आणि आनंदी राहावेत, अशी प्रार्थना केली. या धार्मिक व सामाजिक भेटीदरम्यान माजी नगरसेवक बाबुराव परळकर, पत्रकार संजय देवा कुलकर्णी कुकडगावकर, सामाजिक कार्यकर्ते गोविंद भांगे यांच्यासह अनेक भाविक भक्त उपस्थित होते.

COMMENTS