Homeताज्या बातम्यामनोरंजन

ॲनिमल’च्या गाण्याचे रोमँटिंक पोस्टर रिलीज

मुंबई प्रतिनिधी - सुपरस्टार रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना सध्या त्यांच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचा टीझर यापूर्वीच

भवरी देवी खून, सेक्स स्कँडल प्रकरणातील माजी मंत्र्याचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN
आदिवासी विभागाच्या पदांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
एसटी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ

मुंबई प्रतिनिधी – सुपरस्टार रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना सध्या त्यांच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचा टीझर यापूर्वीच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणबीर आणि रश्मिका पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. निर्माते बुधवारी ‘अॅनिमल’ चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज करणार आहेत. निर्मात्यांनी या गाण्याचे पोस्टर रिलीज केले आहे. ‘अॅनिमल’चे पहिले गाणे 11 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या गाण्याचे शीर्षक ‘हुआ मैं’ असे आहे. सध्या निर्मात्यांनी गाण्याशी संबंधित जास्त माहिती शेअर केलेली नाही. गाण्याच्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. पोस्टरमध्ये रणबीर आणि रश्मिका एकमेकांना किस करताना दिसत आहेत. प्रेक्षक आतापासूनच चित्रपटातील गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत पहिल्या गाण्याचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढली आहे. गाण्याचे पोस्टर उघड करताना रश्मिका मंदान्नाने लिहिले की, ‘हुआ मैं उद्या रिलीज होणार आहे. हे गाणे आग लावेल. प्रत्येक भाषेतील हे गाणे मला व्यक्तिशः खूप आवडले आहे. या चित्रपटात अभिनेत्री गीतांजलीची भूमिका साकारत आहे, ती रणबीर कपूरच्या पात्राची निष्पाप दिसणारी पत्नी आहे. नुकताच ‘Animal’ चा टीझर रिलीज झाला, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता.

COMMENTS