Homeताज्या बातम्या

नांदेडच्या डॉ. ओमकार कानोटे यांना अकॅडमिक सुवर्णपदकासह ‘एमबीबीएस’ पदवी प्रदान; किर्गिस्तानमधील विद्यापीठात गौरव

नांदेड : किर्गिस्तान येथील ओएसएच इंटरनॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या भव्य पदवीदान समारंभात नांदेड येथील डॉ. ओमकार श्याम कान

नांदेडमध्ये महापौरांच्या वॉर्डातच काळ्या, दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा; मनपा प्रशासनाचा नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ!
“वृद्धत्व हा गुन्हा नाही; अत्याचाराचा बळी ठरत असलेले ज्येष्ठ नागरिक चिंतेचा विषय” – डॉ. हंसराज वैद्य
गोदावरी नदीपात्रात नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा दणका; २ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, १० रेती माफियांवर गुन्हा
Graduation Ceremony of Savitribai Phule, Pune University on 12th May

नांदेड : किर्गिस्तान येथील ओएसएच इंटरनॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या भव्य पदवीदान समारंभात नांदेड येथील डॉ. ओमकार श्याम कानोटे यांना अकॅडमिक सुवर्णपदकासह (Academic Gold Medal) एमबीबीएस पदवी प्रदान करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधून केवळ पाच सर्वोत्तम विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देण्यात आले असून, त्यामध्ये डॉ. ओमकार कानोटे यांनी स्थान पटकावले आहे.

सन २०२१ मध्ये ‘नीट’ (NEET) परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे त्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी परदेशात प्रवेश मिळाला होता. किर्गिस्तानमध्ये शिक्षण घेताना विविध आव्हाने आणि अडचणींवर मात करत त्यांनी पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण परिश्रमातून हे दैदिप्यमान यश संपादन केले. त्यांच्या या यशामागे आई अनिता कानोटे, वडील श्याम कानोटे तसेच प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

एमबीबीएस पदवी प्राप्त करून नांदेड येथील स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील निवासस्थानी परतल्यानंतर प्रा. गुणवंत मंगनाळे (मंगनाळे बायोलॉजी क्लासेस) तसेच पॉप्स क्लासेसचे वाडीकर सर यांनी सहकुटुंब डॉ. ओमकार यांचा विशेष सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यात एक सक्षम व सेवाभावी डॉक्टर म्हणून देशसेवा करण्याचा मानस डॉ. ओमकार यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS