जुलमी सरकारची शेतकऱ्यांवर चालू असलेली सुलतानी वसुली त्वरित थांबवा – मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुलमी सरकारची शेतकऱ्यांवर चालू असलेली सुलतानी वसुली त्वरित थांबवा – मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे

अहमदनगर प्रतिनिधी -  शेतकऱ्यांचा आनंदाचा दिवाळी सण तोंडावर आला असताना राज्य सरकारच्या महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांचे वीजबिल थकल्यामुळे कनेक्शन कट

पोटनिवडणुकीत भाजपने मारली बाजी ; विजयी प्रदीप परदेशींनी शिवसेनेच्या तिवारींना चारली धूळ
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर
*तुमचे आजचे राशीचक्र बुधवार,१६ जून २०२१ l पहा

अहमदनगर प्रतिनिधी – 

शेतकऱ्यांचा आनंदाचा दिवाळी सण तोंडावर आला असताना राज्य सरकारच्या महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांचे वीजबिल थकल्यामुळे कनेक्शन कट करण्याची मोहीम हाती घेतली आहे.याचबरोबर ट्रांसफार्मर बंद करून वीज पुरवठा खंडीत करण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे त्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतांना अतिवृष्टीमुळे शेतकरी ओल्या दुष्काळाला सामोरे जात आहे. हातातोंडाशी आलेले उभे पीक शेतकऱ्यांनी गमावले आहे.यातच या जुलमी सरकारने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करून सुलतानी वसुली लावली आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे ताबडतोब शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करणे थांबवावा अन्यथा नेवासा तालुक्यामध्ये भाजप शेतकऱ्यान समवेत मोठे जनआंदोलन उभे करू असा इशारा नेवासा तालुक्याचे मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी अहमदनगर महावितरण कार्यालयाला दिला 

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, सचिन देसरडा, प्रताप चिंधे,डॉ.रावसाहेब फुलारी,ॲड. चांगदेव टकले,आकाश चेडे,प्रकाश लंघे,विजय खंडागळे,उद्धव नांगरे, महेंद्र वांडेकर,सूर्यकांत अंधारे,दिलीप लंघे तसेच आधी शेतकरी यावेळी उपस्थित होते.

निवेदनात पुढे म्हणाले की, शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचे पूर्ण वीजबिल माफ करण्याचे ठरवले असतानाही वीज पुरवठा खंडीत करण्याचे काम सुरू आहे. कारखानदारांकडून उसाच्या पैशाचा दुसरा हप्ता दिवाळीला न मिळाल्याने शेतकऱ्यांकडे कुठल्याही पैशाची आवक नसताना महावितरणकडून जुलमी सरकारच्या माध्यमातून विज कलेक्शन कट कडून सुलतानी वसुली सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ हे सरकार आणत आहे ताबडतोब कट केलेले वीज कनेक्शन जोडून द्यावे व सुलतानी वसुली थांबवावी अशी मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली अन्यथा नेवासा तालुक्यात भाजपच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन शेतकऱ्यांन समवेत उभे करू असा इशारा निवेदनाद्वारे अहमदनगर मध्ये महावितरण कार्यालय येथे अधीक्षक अभियंता यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

COMMENTS