Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुणांच्या हातात पिस्तुलांचा खेळ; वाढती ‘क्रेझ’ समाजासाठी धोक्याची घंटा!

नांदेड : नांदेड शहर आणि परिसरात सध्या एक अत्यंत धोकादायक प्रवृत्तीच्या तसेच राजकीय गुंडागर्दी करणार्‍यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना खतपाण

नांदेडकरांना दिलासा! वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यावर महावितरणची कडक मोहीम; मुख्य अभियंता राजाराम माने यांची ग्वाही
कर्जाच्या दलदलीत अडकलेली नांदेड महापालिका; विकासाचे स्वप्न की आर्थिक दिवाळखोरीची चाहूल?
महसूल सेवा उत्तम प्रकारे राबवली जात आहे -आ.बोंढारकरशिबिरात 702 डिजिटल सातबारा व  669आठ-अ उतार्‍यांचे वाटप; 10 जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

नांदेड : नांदेड शहर आणि परिसरात सध्या एक अत्यंत धोकादायक प्रवृत्तीच्या तसेच राजकीय गुंडागर्दी करणार्‍यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना खतपाणी घालून डोके वर काढताना दिसत आहे-तरुणांमध्ये बंदुकींची वाढती क्रेझ! कधीकाळी शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीसाठी ओळखला जाणारा हा जिल्हा आज दहशतीची स्टाईल मिरवणार्‍या काही भटक्या मानसिकतेच्या तरुणांमुळे बदनाम होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. हातात पुस्तकाऐवजी पिस्तूल आणि चेहर्‍यावर जबाबदारीऐवजी बेफिकिरी-हे चित्र केवळ चिंताजनक नाही, तर समाजाच्या भविष्यासाठी धोकादायक इशारा आहे.
गेल्या महिनाभरात पोलिसांनी 7 पिस्तूल आणि तब्बल 76 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही केवळ आकडेवारी नाही; ही तर समाजाच्या सुरक्षिततेवर आलेली मोठी गदा आहे. या शस्त्रांचा वापर केवळ गुन्ह्यांसाठीच नव्हे, तर स्टेटस दाखवण्यासाठी केला जात आहे, ही बाब अधिक धक्कादायक आहे. सोशल मीडियावर रील्स, फोटो आणि व्हिडिओंमधून बंदुकींचे प्रदर्शन करणे, टोळक्यांमध्ये वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शस्त्रांचा वापर करणे-ही विकृत मानसिकता झपाट्याने वाढताना दिसते. आजचा काही तरुण भीती निर्माण करणे म्हणजे ताकद असा भ्रामक समज करून घेत आहे. पण ही ताकद नसून आत्मविनाशाचा मार्ग आहे, हे त्यांना उमजत नाही. या प्रवृत्तीमागे अनेक कारणे आहेत-घरातील दुर्लक्ष, शिक्षणातील मूल्यांचा अभाव, आणि समाजात वाढत चाललेली हिंसात्मक स्पर्धा. पालकांनी आपल्या मुलांच्या हालचाली, मित्रपरिवार आणि वागणुकीकडे डोळसपणे लक्ष देणे आवश्यक आहे. आपला मुलगा चुकीच्या मार्गावर जाऊ शकत नाही हा अंधविश्वास आता परवडणारा नाही. यामध्ये आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे काही ठिकाणी या प्रवृत्तीला अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय किंवा स्थानिक पातळीवर दादागिरीला मिळणारे मौन समर्थन ही परिस्थिती अधिक बिघडवणारी ठरत आहे. जर समाजाने आणि प्रशासनाने वेळेवर कठोर पावले उचलली नाहीत, तर ही ठिणगी मोठ्या आगीचे रूप धारण करू शकते. पोलिस प्रशासनाने याबाबत कारवाई सुरू केली असली, तरी केवळ जप्ती आणि अटक यावर हा प्रश्न सुटणार नाही. ही लढाई मानसिकतेविरुद्ध आहे. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि पालक यांनी एकत्र येऊन मूल्याधारित शिक्षण, मार्गदर्शन आणि जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. तरुणांना योग्य दिशादर्शन देणे, त्यांच्या ऊर्जेला सकारात्मक वळण देणे-हीच खरी उपाययोजना आहे. नांदेडसारख्या संवेदनशील जिल्ह्यात अशी प्रवृत्ती वाढणे ही केवळ स्थानिक समस्या नाही, तर राज्यासाठीही इशारा आहे. स्टाईलच्या नावाखाली दहशत मिरवणार्‍यांना समाजाने स्पष्ट संदेश द्यायला हवा-बंदुकीची भाषा नाही, तर संस्कारांची शक्तीच खरी ताकद आहे. अन्यथा, आजची ही ‘क्रेझ’ उद्याचा मोठा संकटाचा स्फोट ठरू शकते. नांदेड शहरांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही टारगट मुले बुलेटवर ठक ठक आवाज काढत रस्त्यावर बेफाम वेगाने गाड्या चालवत आहेत. तसेच राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने काही कार्यकर्ते परवानगी नसताना शहरांमध्ये रस्त्यावर चक्क दारू विक्री व बियर विक्री करत आहेत व दुकानाच्या पाठीमागील आडोशांमध्ये तरुणांना दारू व बियर पिण्यासाठी सुविधा पुरवत आहेत. हे पोलिसांना माहीत असून सुद्धा छापे टाकण्याची हिंमत पोलीस करत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

COMMENTS