Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

आनंद परांजपे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठीलवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला असून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे-पालघर समन्वयक आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व प

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुधवारी सपत्नीक श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
महामार्गावर तरुणाच्या दुचाकीने घेतला पेट


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला असून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे-पालघर समन्वयक आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, त्यांच्या शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चांनाही जोर आला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा स्वीकारल्यानंतर संघटनात्मक पातळीवर अनेक बदल घडत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानेही विविध तर्कवितर्क रंगले होते. अशातच आनंद परांजपे यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षात मोठी स्पर्धा होती. मात्र पक्षाने झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिल्यानंतर आनंद परांजपे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अखेर त्यांनी पक्षातील सर्व जबाबदार्‍यांचा राजीनामा देत नाराजी उघडपणे व्यक्त केली. राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी, पक्षाने आजवर माझ्यावर विश्‍वास ठेवून विविध जबाबदार्‍या दिल्या, त्याबद्दल मी पक्षाचा ऋणी आहे. मात्र माझा राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती केली आहे.

COMMENTS