प्रवराच्या उजव्या कालव्यात अनोळखी प्रेत सापडले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवराच्या उजव्या कालव्यात अनोळखी प्रेत सापडले

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी: गुहा पिंपळगाव शिव हद्दीत प्रवरा उजव्या कालव्यात एका 40 वर्ष वयाच्या अनओळखी महिलेचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत सापडले आहे.

कोपरगावात रविवारी चैत्रोत्सवाचे आयोजन
मनपा अधिकाऱ्यांना शहरांमधील खड्ड्यात झोपविनार: शिवसेनेचा इशारा
शालेय साहित्याचे वाटप

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी: गुहा पिंपळगाव शिव हद्दीत प्रवरा उजव्या कालव्यात एका 40 वर्ष वयाच्या अनओळखी महिलेचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत सापडले आहे. हे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे स्थानिक नागरीकांनी पाहिल्या नंतर त्यांनी पोलिसांना पाचारण करण्यात केले.
 गुहा पिंपळगाव शिव हद्दीतील प्रवरा उजव्या कालव्यात कुजलेल्या अवस्थेतील महिलेचे प्रेत मिळून आले आहे. प्रवरा उजवा कालव्यातुन रोटेशन सुरु असुन सदर महिलेचे प्रेत या ठिकाणी कसे आले. पाण्याच्या प्रवाहात वाहत आले की, कोणी आणून टाकले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु होती. मंगळवारी दुपारी स्थानिक नागरीकांनी पाण्यावर तरंत असलेले महिलेचे प्रेत पाहिले. येथिल पोलिस पाटील व सरपंच यांना या प्रेताबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात सदर घटनेची माहिती कळवली. त्यानुसार राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नाना सुर्यवंशी यांच्यासह साहय्यक फौजदार एन. आर. शिंदे, पो.हे.काँ. लक्ष्मण बोडखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रवरा उजव्या कालव्यातील पाण्यावर तरंगत असलेले महिलेचे कुजलेले प्रेत बाहेर काढले असता मृतदेह पुर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. साई प्रतिष्ठाणची रुग्णवाहीनी चालक रविंद्र देवगिरे यांनी यावेळी मदत केली.सदर महिला कुठली व तिचा घातपात झाला का?  याचे उत्तर शवविच्छेदनाच्या अहवाला नंतर स्पष्ट आहे.  

COMMENTS