Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयंत कबड्डी प्रिमियर लीग’चे 20 फेब्रुवारी ला शुभारंभ; राष्ट्रीय कबड्डीपटू खंडेराव जाधव यांची माहिती

इस्लामपूर / प्रतिनिधी : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजारामनगर (इस्लामपूर) येथील जयंत स्पोर्टस् यांच्या वतीने ’जयंत कब

महावितरणच्या अथक प्रयत्नांना यश; कृषिपंपांना 8 तास सुरळीत वीजपुरवठा
फलटण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त
मॉड्युलर बेडचे नागरिकांनी व्यवस्थित वापर करावा : राहुल महाडीक

इस्लामपूर / प्रतिनिधी : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजारामनगर (इस्लामपूर) येथील जयंत स्पोर्टस् यांच्या वतीने ’जयंत कबड्डी प्रिमियर लीग’चे दि.20,21,22 व 23 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजन केले आहे. क्रीडा प्रेमींना सलग दुसर्‍या वर्षी जयंत स्पोर्ट्सच्या मैदाना वर कबड्डीचा थरार पहायला मिळणार आहे. ना. जयंत पाटील यांच्या हस्ते दि. 20 रोजी सायंकाळी 5 वाजता लीगचा शुभारंभ होणार आहे. ही माहिती जयंत स्पोर्ट्सचे संस्थापक, माजी नगरसेवक व राष्ट्रीय कबड्डीपटू खंडेराव जाधव (नाना) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांचा राजारामबापू ईगल्स कासेगाव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील स्व. जगदीश पाटील (आप्पा) रायडर्स कामेरी, आदिती उद्योग समूहाचे पृथ्वीराज पाटील यांचा आदिती पँथर्स ओझर्डे, रविंद्र पाटील (वाळवा) यांचा राजेंद्र पाटील युवा मंच फायटर्स, अतुल लाहिगडे (कासेगाव) यांचा शरद लाहिगडे हरिकन्स, सागर पाटील,संजय जाधव (जुनेखेड) यांचा स्फुर्ती रॉयल्स हे गेल्या वर्षीचे सहा संघ खेळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांचा जय हनुमान सहकारी नागरी पतसंस्था आणि शिराळ्याचे युवा नेते पृथ्वी नाईक यांचा शिराळा कोब्रा हे दोन संघ नव्याने सहभागी केले आहेत.
वाळवा, शिराळा तालुक्यातील कबड्डी खेळास मोठी परंपरा आहे. आपल्या भागात अनेक गुणी युवा कबड्डीपटू आहेत. त्यांना प्रोत्साहन व स्पर्धांचा अनुभव मिळाला, तर नक्की राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू पुढे येतील. आपल्या भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही लिग घेत आहोत. गेल्या वर्षी लीगला कबड्डी प्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या वर्षीही ही लीग अधिक नेटकी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
गेल्या वर्षी लिग केवळ वाळवा तालुक्यापुरती होती. मात्र, यावर्षी शिराळा तालुक्याचा समावेश केलेला आहे. शिराळा तालुक्यातील खेळाडू व कबड्डी प्रेमींच्या सहभागाने लीगची रंगत वाढेल. गेल्या वर्षी 60 किलो वजनी गटाखालील खेळाडू खेळले होते. यावर्षी 70 किलो वजनी गटाखालील खेळाडू खेणार आहेत. मैदानात एलईडीची व्यवस्था केली आहे. एखादा चुकीचा निर्णय होवू नये,संभाव्य वाद टाळावा, यासाठी तांत्रिक समिती केली आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने, राष्ट्रीय कबड्डीपटू विकास पाटील कामेरी हे दोघे या समितीचे सदस्य असतील. व्यासपीठ रचना बदलली असून संघांचे मालक,मान्यवर अतिथी व महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे. बक्षीस रक्कम कायम असली, तरी अष्टपैलू खेळाडूसह इतर खेळाडूंनाच्या मानधन व बक्षीसमध्ये वाढ केली आहे
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने, आदिती समूहाचे पृथ्वीराज पाटील, जयंत स्पोर्ट्सचे अध्यक्ष सागर जाधव, माजी नगरसेवक आयुब हवलदार, रवी पाटील (वाळवा), विकास पाटील कामेरी, सागर पाटील जुनेखेड, संजय जाधव, अतुल लाहिगडे (कासेगाव), विजय देसाई (सोन्याबापू), शिवाजी पाटील, उमेश रासनकर प्रामुख्याने उपस्थित होते.
निवड चाचणी व खेळाडू लिलाव
गेल्या आठवड्यात या लिगसाठी तीन दिवस निवड चाचणी झाली. वाळवा व शिराळा तालुक्यातील 22 संघातील 250 च्यावर खेळाडूंनी या चाचणीत भाग घेतला. आयुब कच्छी कराड, नामदेव गावडे, संदीप लवटे, कुबेर पाटील कोल्हापूर यांच्या समितीने 96 खेळाडूंची निवड केली. सोमवारी सायंकाळी खेळाडू लिलाव प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये 8 संघांना चिठ्ठ्याद्वारे प्रत्येकी 7 खेळाडू देण्यात आले. तसेच त्यांच्या पसंतीने प्रत्येकी 5 खेळाडू घेण्यात आले. ग्रामीण भागातील खेळाडू व क्रीडा प्रेमींनी लिलाव प्रक्रियेचा वेगळा अनुभव घेतला.

COMMENTS