Homeताज्या बातम्यामनोरंजन

आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांची प्रकृती गंभीर

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. तिच्या अभिनयाला आणि सौंदर्याला तोड नाही. नुकताच तिला 'गंगुबाई काठियावा

केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांना त्यांच्याच मंत्रालयाकडून ९९ लाखांची सबसिडी! काकडीच्या शेतीवरून भागीरथ चौधरी वादाच्या भोवऱ्यात
’नाटू-नाटू’ वर ऑस्करची मोहोर
शिवसेनेकडून महागाईच्या मुद्द्यावरून मोर्चाचे आयोजन… | LOKNews24

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. तिच्या अभिनयाला आणि सौंदर्याला तोड नाही. नुकताच तिला ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला आणि सध्या ती आयफा 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी अबुधाबीला निघाली होती.मात्र वाटेतच एक वाईट बातमी तिला समजली आणि ती मागे फिरली. आलियाच्या आईचे वडील, म्हणजे आजोबा नरेंद्र राजदान यांची प्रकृती खालावली आहे. तिचे आजोबा अत्यावस्थ असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांना मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना यापूर्वीही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आता प्रकृती अधिक खालवल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आलिया आपल्या आजोबांच्या फारच जवळ आहे. त्यामुळे तिला ही बातमी कळताच ती सर्व कामे सोडून रुग्णालयात पळाली. आजोबांचे वय 95 वर्षे असून त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत

COMMENTS