Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. तुषार हाकाळे हे तांदळा गावातील पहिले एमबीबीएस चे मानकरी

तलवाडा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील तांदळा येथील श्री हरीभाऊ तुळशीराम हाकाळे (शिक्षक) यांचे चिरंजीव डॉ. तुषार हे एमबीबीएस पदवी परीक्षा उत्तीर्ण

नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम वेगात ; 85 खांब राहिले उभे, नियोजित वेळेआधीच काम पूर्ण होण्याची शक्यता
जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोना वाढणार : अजित पवारांची टीका
अपात्रतेचा निर्णय नियमांनुसारच होईल

तलवाडा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील तांदळा येथील श्री हरीभाऊ तुळशीराम हाकाळे (शिक्षक) यांचे चिरंजीव डॉ. तुषार हे एमबीबीएस पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. तांदळा गावामधून एमबीबीएस चे शिक्षण घेतलेले हे पहिले मानकरी ठरले त्याबद्दल सर्व स्तरांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.
डॉ. तुषार यांचे शिक्षण 1 ते 4 थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळा येथे त्यांच्या मूळ गावी झाले. तर पुढील शिक्षण 5 ते 10 वी चंपावती विद्यालय बीड, 11-12वी जय भवानी उच्च माध्यमिक विद्यालय गढी व एमबीबीएस डॉ विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय अहमदनगर येथे पूर्ण झाले. मला मिळालेल्या यशाबद्दल सर्व स्तरामधून माझे अभिनंदन होत आहे. माझ्या यशाचे श्रेय मी माझे आई-वडील व माझ्या गुरुजनांचे आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताना मी अतिशय प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करेन. मला दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. डॉ. तुषार यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक व सर्व हितचिंतक यांच्यासह गावकर्‍यांकडून कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS