Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाच्याच्या साखरपुड्यात एकत्र

मुंबई प्रतिनिधी - शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. धारावी पु

महायुतीमध्ये चौथा भिडू होणार दाखल ?
राज ठाकरे यांच्या विरुद्ध परळी न्यायालयाने बजावलेलं अटक वॉरंट रद्द
सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही आलेला नाही

मुंबई प्रतिनिधी – शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. धारावी पुनर्वसन प्रकल्पांत कंत्राट अदानी ग्रुपला दिल्याच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आमने-सामने आले होते. राजकीय भूमिका भिन्न असल्या तरी दोन्ही नेते आपलं कौटुंबिक कर्तव्य देखील योग्य पद्धतीने एकत्र पार पाडताना दिसतात.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र दिसले. राज ठाकरे यांची बहीण जयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र दिसले. या कार्यक्रमाला संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं. मुंबईतील दादर येथे हा साखरपुड्याचा समारंभ पार पडला.राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे राजकारणात जरी वेगळे असले तरी कौटुंबिक नात्याने ते एकत्र असल्याचं अनेकदा पाहायला मिळालंय. राज ठाकरे तसेच उद्धव ठाकरे समर्थक आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये या दोन्हीही भावांनी एकत्र यावं अशी चर्चा नेहमीच होत आसते. कुटुंबावर एखादं संकट आल्यावर देखील दोन्ही भाऊ एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. दिशा सालियन प्रकरणी देखील राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंची बाजू घेतली होती. आदित्य असं काही करेल असं मला वाटतं नाही. चौकश्या काहीही लावू शकतात. आम्ही पण याच्यातून खूपदा गेलो आहोत, असं शर्मिला ठाकरेंनी यावेळी म्हटलं होते. शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची बाजू घेतली होती त्यावेळी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार का? अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.

COMMENTS