Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराई येथे श्रीराम जन्मोत्सव उत्सव उत्साहात साजरा

गेवराई प्रतिनिधी - शहरातील श्रीराम मंदिर येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सव निमित्य विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले मंदिरात भव्य भव्य सजावट करण्यात

 कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात
चेंबरमधे गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू
वर्धा अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू ; भाजप आमदार पुत्राचाही समावेश

गेवराई प्रतिनिधी – शहरातील श्रीराम मंदिर येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सव निमित्य विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले मंदिरात भव्य भव्य सजावट करण्यात आली होती. सकाळी   प्रभू रामचंद्रांना पूजा व अभिषेक  त्यानंतर  श्री  योगीराज महाराज गोसावी( श्री संत एकनाथ महाराज यांचे वंशज श्री क्षेत्र पैठण) यांचे कीर्तन उत्साहात पार पडले त्यानंतर दुपारी बारा वाजता मंदिरामध्ये विधिवत पूजन जन्मोत्सव किर्तन, आरती, पाळणा, गायन गाऊन गुलालाची उजळण पुष्परष्टी करत जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

सदरील कार्यक्रमास मा. जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग पंडित व श्री शिवराज पवार,उपनगर अध्यक्ष श्री राजेंद्र राक्षस भुवनकर व इतर गेवराई शहरातील प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर, वकील वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. या वर्षी संस्थानाच्या वतीने प्रभू श्रीरामाच्या जीर्णोद्धार करून नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली यामध्ये विशेष राम-सीता-लक्ष्मण-हनुमान यांची व गुरुदत्त महाराज यांची आकर्षक   मूर्ती बघण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी तालुक्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती  संस्थानाच्या वतीने  सायंकाळी सहा वाजता वाजत गाजत श्री रामाची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये पुरुषासह महिलांनी सहभाग घेऊन श्रीराम जल्लोषाने शहर दणाणून सोडले होत.े शहरातील युवकांनी प्रभू श्री रामचंद्राची आरती करून ढोल-ताशाच्या गजरात शोभा यात्रेला प्रारंभ केला होता सदरील मिरवणूक मेन रोड-रंगार चौक-तहसील रोड-शास्त्री चौक -माळी गल्ली-मोमीनपुरा- मेन रोड या मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. जागोजागी  राम भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती व रांगोळी व सजावट करण्यात आली होती तसेच मिरवणुकीच्या मार्गावर राम भक्ताने पाणी व सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. श्री राम संस्थान मार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते  यावेळी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राम संस्थानाच्या वतीने गणेश रामदासी ,विनायक रामदासी, रवींद्र रामदासी, अनिल रामदासी, श्रीपाद रामदासी, अनंत रामदासी, सचिन रामदासी, प्रमोद रामदासी, नागेश रामदासी, दयानंद रामदासी, डॉ.हेमंत वैद्य, अनिल बोर्डे, मिलिंद वाघमारे, अ‍ॅड. प्रशांत वाघमारे, कमलाकर पाठक, अशोक देऊळगावकर, मोहन राजहंस आदींनी परिश्रम घेतले.

COMMENTS