Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशाला मोदींशिवाय पर्याय नाही

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडली भूमिका

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात राजकारणात कोण कोणत्या पक्षात आहे, याचा मेळ लागत नसतांनाच, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अजित प

मार्डच्या मागण्यांवर कॅबिनेटमध्ये निर्णय होणार
राज्यात राजकीय जोर-बैठका सुरूच
अशोक चव्हाण-अजित पवारांमध्ये ’गुफ्तगू’

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात राजकारणात कोण कोणत्या पक्षात आहे, याचा मेळ लागत नसतांनाच,
 महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत सत्तेत सहभागी झाले आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान आज अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली, या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, मंत्रिमंडळाची पहिली बैठक 9 मंत्र्यांची होती आम्हाला अडीच वर्षाचा अनुभव आहे. मध्ये एक वर्षाचा गॅप पडला. राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय आम्ही मार्गी लावले. एकनाथ शिंदे यांनी आणि मी सोबत काम केले आहे. भाजपमधील अनेक नेत्यांसोबत मी काम केले आहे. विकासाच्या मुद्द्यांवर मी सरकारसोबत आलो आहे. देशपातळीवर नरेंद्र मोदींशिवाय आज देशाला पर्याय नाही. देश त्यांच्या नेतृत्वाखाली आगेकूच करत आहे, असे अजित पवार म्हणाले. खातेवाटपावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली आहे. आम्ही एकत्रपणे काम करायचे ठरवले आहे, असे पवार म्हणाले.

अजित पवारांना मिळणार महसूल खाते – सुत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. छगन भुजबळ ओबीसी कल्याण, दिलीप वळसे पाटील संसदीय कार्य आणि कृषी मंत्रालय, हसन मुश्रीफ औकाफ आणि कामगार कल्याण मंत्रालय, आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि  बालविकास खाते, धनंजय मुंडे यांना समाज कल्याण मंत्रालय, संजय बनसोड क्रीडा आणि युवक कल्याण, अनिल पाटील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तर धर्माराव आत्राम यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची जबादारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, खाते वाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रार्थमिक चर्चा झाली आहे. त्यांना नागपूरला जायचे असल्याने पूर्ण चर्चा झाली नाही. रात्री उशीरा याबाबत निर्णय होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

COMMENTS