Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीत विरोधकांनी काढला ईडी कार्यालयावर मोर्चा

नवी दिल्ली : अदानी समूहाच्या विरोधात संयुक्त संसदीय समितीची मागणी लावून धरणार्‍या विरोधी पक्षांनी बुधवारी नवी दिल्ली येथील अंमलबजावणी संचालनालय (

मराठा आंदोलक आरक्षणासाठी आक्रमक
मालाडमध्ये गटारात कोसळून दोघांचा मृत्यू
माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांचे लाक्षणिय काम बंद आंदोलन

नवी दिल्ली : अदानी समूहाच्या विरोधात संयुक्त संसदीय समितीची मागणी लावून धरणार्‍या विरोधी पक्षांनी बुधवारी नवी दिल्ली येथील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयावर मोर्चा काढला. ईडीने अदानी प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. विरोधकांचा मोर्चा बुधवारी सकाळी दिल्लीच्या विजय चौकातून पुढे जात असतानाच दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखले.
विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात बुधवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीला अनेक विरोधी पक्षातील अनेक खासदार उपस्थित होते. त्यानंतर विरोधकांनी ईडी कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), समाजवादी पक्ष, जनता दल (संयुक्त), आम आदमी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), केरळ काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, इंडियन युनियन मुस्लिम लीग, शिवसेना (उद्धव ठाकरे) , मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम, राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, विदुथलाई चिरुथाईगल काची आणि काँग्रेस सहभागी झाले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी)  आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मोर्चात सहभागी झाले नाहीत. मोर्चादरम्यान मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, अदानी घोटाळ्याप्रकरणी आम्ही ईडीच्या संचालकाची भेट घेणार आहोत. मात्र सरकार आम्हाला विजय चौकाजवळ कुठेही जाऊ देत नाही, त्यांनी आम्हाला रोखले आहे. लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे, एलआयसी, एसबीआय आणि इतर बँका डबघाईला आल्या आहेत.अदानींच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर विजय चौकात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंडेनबर्ग अहवाल समोर आल्यापासून विरोधक अदानीचा मुद्दा उचलत आहेत आणि हिंडेनबर्ग-अदानी अहवालाची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी करत आहेत. एका महिन्याच्या विश्रांतीनंतर सोमवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झाला. विरोधकांच्या सततच्या गदारोळ आणि विरोधामुळे संसदेच्या सत्रात वारंवार व्यत्यय येत आहे.

COMMENTS