Homeताज्या बातम्याशहरं

महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा संभाजी भिडेला इशारा

मुंबई ः संभाजी उर्फ मनोहर भिडेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. यावर आता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र

लाठीहल्ल्याप्रकरणी सरकारची माफी
नागपुरातील पूरग्रस्तांना मिळणार तातडीची मदत
बा…विठ्ठला ! शेतकरी, कष्टकरी वर्गावरील संकटे दूर कर !

मुंबई ः संभाजी उर्फ मनोहर भिडेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. यावर आता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे याच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधी यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला.

भिडेच्या वक्तव्यासंदर्भात राज्य सरकार उचित कारवाई करेल, असेही फडणवीसांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते. संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा महानायकाबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे पूर्णपणे अनुचित आहे. माझे स्पष्ट मत आहे की, अशा प्रकारचे वक्तव्य भिडे गुरुजींसह इतर कुणीही करू नये. कारण अशा वक्तव्यांमुळे करोडो लोकांच्या मनात निश्‍चितपणे संताप निर्माण होतो. लोक महात्मा गांधींविरुद्ध बोललेले कधीही सहन करणार नाही. या संदर्भात राज्य सरकारकडून उचित कारवाई केली जाईल. महात्मा गांधी असो वा स्वातंत्र्यवीर सावरकर असो, कुणाच्याही विरुद्ध बोललेले आम्ही खपवून घेणार नाही. संभाजी भिडेंचा भाजपशी काहीही संबंध नाही. ते स्वत:ची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचे काहीही कारण नाही. संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरत आहेत. पण राहुल गांधी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अतिशय गलिच्छ बोलतात, त्याचाही त्यांनी निषेध केला पाहिजे. पण त्यावेळी ते मिंधे होतात. म्हणून कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

COMMENTS