Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुसळधार पावसाने काठी शाळेची संरक्षण भिंत जमीनदोस्त

काठी : शाळेची संरक्षण भिंत कोसळल्याने लगतच्या घरांचे झालेले नुकसान. (छाया : संजय कांबळे) पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील डोंगराळ भागात परतीच्य

दरोड्यातील फरारी तडीपार गुंड जेरबंद
ठाण्यात एका रात्रीत उपचारादरम्यान 17 रुग्णांच्या मृत्यू; अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत
सातारा जिल्हा प्रशासनातर्फे महाबळेश्‍वर येथे राज्यपालांचे स्वागत

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील डोंगराळ भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे पिकांचे तसेच घर शाळांचे मोठे नुकसान होत आहे. शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षण भिंत कोसळली. यामध्ये लगतच्या दोन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या मुळे कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी संरक्षण भिंत कोसळल्याने शाळेच्या इमारतीस धोका निर्माण झाला आहे. दरम्यान काठी गावच्या ग्रामस्थांनी सहकार्य करुन रस्ता मोकळा केला.
संरक्षण भिंत कोसळल्याने शाळेची इमारत धोकादायक झाल्याने विद्यार्थी, शिक्षकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, संरक्षण भिंतीच्या कामासाठी पाटण प्रशासनाने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करून संरक्षण भिंत बांधून द्यावी, अशी मागणी काठी ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS