Homeताज्या बातम्यादेश

तामिळनाडूत 97 लाख मतदारांची नावे वगळले

मतदार पडताळणीनंतर निवडणूक आयोगाने जाहीर केली यादीचेन्नई : तामिळनाडू राज्यातील मतदार याद्यांची एसआयआर अर्थात विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रिया पूर्ण झ

आदित्य नर्सिंग महाविद्यालयाचा 7 व्या सत्राचा निकाल 100 टक्केयशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सन्मान
रांजणगांव देशमुख उपबाजार समिती केंद्र निर्मीतीसाठी शासकीय जमीन मंजुर : स्नेहलताताई कोल्हे
महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशांची सत्ता पुरस्कृत लूट!

मतदार पडताळणीनंतर निवडणूक आयोगाने जाहीर केली यादी
चेन्नई : तामिळनाडू राज्यातील मतदार याद्यांची एसआयआर अर्थात विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने 23 फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली. या व्यापक पडताळणी मोहिमेमुळे तब्बल 97 लाख 37 हजार 831 नावे वगळण्यात आली असून, मतदार यादीत लक्षणीय घट झाली आहे.
राज्यात ही विशेष सखोल फेरतपासणी 4 नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आली होती. सुमारे चाळीस दिवस चाललेल्या या प्रक्रियेचा समारोप 14 डिसेंबर रोजी झाला. त्यानंतर 19 डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्यामध्ये 5 कोटी 43 लाख 76 हजार 757 मतदारांचा समावेश होता. फेरतपासणीपूर्वी तामिळनाडूमध्ये एकूण 6 कोटी 41 लाख 14 हजार 587 मतदार नोंदणीकृत होते. मात्र, तपासणीनंतर ही संख्या लक्षणीयरीत्या घटली. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, सुमारे 27 लाख मृत मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली. तसेच 66 लाख 45 हजार मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले किंवा नोंदविलेल्या पत्त्यावर वास्तव्यास नसल्याचे आढळून आले. याशिवाय, एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नोंद, पुनरावृत्ती नोंदी आणि इतर तांत्रिक कारणांमुळे उर्वरित नावे कमी करण्यात आली. दरम्यान, मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले. नाव समाविष्ट करण्यासाठी 17 लाख 10 हजार, नाव वगळण्यासाठी 1 लाख 84 हजार आणि तपशील दुरुस्तीसाठी 5 लाख 51 हजार अर्ज दाखल झाले. एकूण 24 लाख 47 हजार अर्ज प्रत्यक्ष पद्धतीने, तर 10 लाख 28 हजार अर्ज संकेतस्थळाद्वारे प्राप्त झाले. अशा प्रकारे एकूण 34 लाख 75 हजार 717 अर्जांची छाननी करून त्यांची पडताळणी प्रक्रिया 10 फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आली. या व्यापक फेरतपासणीमुळे मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत झाल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

COMMENTS