Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अ‍ॅड. पल्लवी कांबळेचा नॅशनल फिनिक्स गोल्ड स्टार अवॉर्डने सन्मान

राहुरी ः आधार सोशल फौंडेशन, बेळगाव यांच्या वतीने अ‍ॅड. पल्लवी शरदराव कांबळे यांना नॅशनल फिनिक्स गोल्ड स्टार अवॉर्ड 2023 ने गौरविण्यात आले. आधार स

देवळाली प्रवरातील इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के
पारनेरमध्ये विशेष मार्गदर्शन शिबीर उत्साहात; विविध शासकीय योजनांची माहिती, दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नगरमध्ये अल्पवयीन मुलगी व महिला बेपत्ता

राहुरी ः आधार सोशल फौंडेशन, बेळगाव यांच्या वतीने अ‍ॅड. पल्लवी शरदराव कांबळे यांना नॅशनल फिनिक्स गोल्ड स्टार अवॉर्ड 2023 ने गौरविण्यात आले. आधार सोशल फौंडेशनच्यावतीने समाजाच्या सर्वांगीण विकासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तिंना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्काराने गौरविले जाते. राष्ट्रीय आदर्श समाजरत्न प्रेरणा गौरव पुरस्कारासाठी अ‍ॅड. पल्लवी शरदराव कांबळे यांची निवड समितीने निवड केली होती. न्यायाधीश रवींद्र कुलकर्णी व सिंधुताई सपकाळ यांचे मानसकन्या सुनीताताई मोडक यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार अ‍ॅड. पल्लवी शरदराव कांबळे यांना पुणे येथे जाहीर कार्यक्रमात देण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप कोल्हापुरी फेटा, श्रीफळ, सन्मानचिन्ह, गौरव पत्र, मेडल असे आहे.

COMMENTS