Homeताज्या बातम्यासंपादकीय

काँगे्रसची दिशा आणि दशा !

भारतीय राष्ट्रीय काँगे्रसची स्थापनाच मुळात 1885 मध्ये झाली होती. आज हा पक्ष तब्बल 138 वर्षांचा राष्ट्रीय पक्ष आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानं

नव्या शैक्षणिक धोरणाची उपयुक्तता
सत्ता-संघर्षाचे राजकारण
परदेशी विद्यापीठांसाठी भारतीय बाजारपेठ खुली

भारतीय राष्ट्रीय काँगे्रसची स्थापनाच मुळात 1885 मध्ये झाली होती. आज हा पक्ष तब्बल 138 वर्षांचा राष्ट्रीय पक्ष आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 50 वर्षांपेक्षाही अधिक काळ हा पक्ष सत्तेत होता. मात्र 2014 नंतर या पक्षाला जी घरघर लागली ती, अजूनही संपता येईना. 9 वर्ष हा पक्ष सत्तेबाहेर असूनही, या पक्षाला अजूनही सुर सापडतांना दिसून येत नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे नुकत्यात झालेल्या पाच राज्यापैंकी चारही राज्यात काँगे्रस अपयशी ठरले आहे. तेलंगणामध्ये काँगे्रस यशस्वी झाला असला तरी, तेथील स्थानिक काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांचे ते यश म्हणावे लागेल. राष्ट्रीय नेत्यांचे ते यश म्हणता येणार नाही. त्याचबरोबर राजस्थान आणि छत्तीसगड सारख्या राज्यात सत्ता असलेले राज्य काँगे्रसने गमावले आहे. त्यामुळे काँगे्रसने विचारमंथन करण्याची खरी गरज आहे. किंवा आपण भाजपसोबत लढू शकत नाही, याची कबूली देण्याची खरी गरज आहे. तब्बल 138 वर्षांचा पक्ष, अनेक दशके सत्ता भोगलेला हा पक्ष आज दुबळा झाल्याचे दिसून येत आहे. जर्जर झाला असून, या पक्षात प्राण ओतण्याची खरी गरज आहे. पक्षाला जिंवत ठेवण्यासाठी सातत्याने कार्यक्रम द्यावे लागतात, जनतेशी नाळ जोडलेली ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत सातत्याने जनसंपर्क ठेवावा लागतो, राज्य चालवतांना जनतेला काय हवे, याचे भान असायला हवे. खरंतर राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात काँगे्रस आरामात सत्तेवर येऊ शकली असती. त्यासाठी तेथील शासनकर्त्यांनी नाविण्यपूर्ण योजना राबवण्याची खरी गरज होती. मात्र त्या राबवण्यात तेथील मुख्यमंत्री कमी पडले. त्यामुळे काँगे्रसची पुरती वाताहात होतांना दिसून येत आहे. केंद्रातील मोदी सरकार जरी ताकदवर असेल तरी, हा पक्ष चुकत नसेल असे नाही. या पक्षाच्या ध्येय-धोरणांत अनेक उणीवा असूनही त्या जनतेमध्ये नेण्यात, त्या समोर आणण्यात काँगे्रस पक्ष अपयशी ठरतांना दिसून येत आहे. काँगे्रस नेतेे राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँगे्रसने खरंतर एखाद्या तरूणाला पक्षाचे अध्यक्षपद देण्याची गरज होती. कारण मल्लिकार्जुन खरगे जरी पक्षाला मार्गदर्शन करील असले तरी, ते पक्षासाठी सारखी धावपळ करू शकत नाही. सोनिया गांधी ज्याप्रमाणे तब्बेतीमुळे पक्षात सक्रिय नाही, त्याचप्रमाणे खरदे देखील त्यांचे वय बघता, पक्षासाठी पायाला भिंगरी बांधून फिरू शकत नाही. खरंतर पक्षाचे अध्यक्षपद राहुल गांधी यांनी स्वतःकडे ठेवून, पक्षात अनेक विभाग तयार करण्याची गरज होती. पक्षासाठी ध्येय-धोरणे आखण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्याची खरी गरज होती. मात्र काँगे्रस प्रत्येकवेळेस चुका करतांना दिसून येत आहे. याउलट भाजप सत्तेत असूनही पुन्हा एकदा नव्या दमाने निवडणूक लढतांना दिसून येत आहे. मध्यप्रदेश राज्यात निवडणुकीपूर्वीचे कल बघितले असता, भाजपच्या ताब्यातून निसटेल यात शंकाच नव्हती. कारण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान यांच्यावर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, गेल्या अनेक वर्षांपासूनचे त्यांचे नेतृत्व यामुळे तेथील जनतेला उबग आला होता, त्यामुळे सत्तापरिवर्तन अटळ असल्याचे बोलले जात होते. मात्र ऐनवेळे जादूची कांडी फिरावी तसे वातावरण फिरले, आणि भाजपने पाशवी मत तिथे प्राप्त केले. यामागे भाजपने आणलेली लाडली बहन योजना, ओबीसी आरक्षण, यासोबतच शिवराजसिंह यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर न करता, नवा चेहरा देण्याचे अप्रत्यक्षरित्या दाखवल्यमुळे भाजपला तिथे प्रचंड बहुमत मिळाले. भाजप हारलेली बाजू पलटतांना दिसून येतो, मात्र काँगे्रस तसा चमत्कार करू शकत नाही. भाजप नेते अमित शहा, जेपी नड्डा, यांच्यासह अनेक नेते मध्यप्रदेशात तळ ठोकून होते, याउलट मात्र काँगे्रस नेते काय करत होते, ते सांगायला नकोच. त्यामुळे काँगे्रसने निवडणुका लढतांना आपली स्टॅ्रटजी बदलण्याची गरज आहे. 

COMMENTS