Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव शहरात महिलेची आत्महत्या, तीन आरोपींवर गुन्हा

कोपरगाव ः कोपरगाव शहरातील अंबिकानगर येथील रहिवासी असलेली महिला निता मनोज शर्मा (वय-26) हिला सासरच्या नातेवाईकांनी माहेरून दुचाकी आणण्यासाठी व किर

महिलेचा विनयभंग, पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल
तिहेरी हत्याकांडामुळे उत्तर प्रदेश हादरलं! 
उद्योजकाला प्रेमात अडकवून उकळले सव्वा कोटी

कोपरगाव ः कोपरगाव शहरातील अंबिकानगर येथील रहिवासी असलेली महिला निता मनोज शर्मा (वय-26) हिला सासरच्या नातेवाईकांनी माहेरून दुचाकी आणण्यासाठी व किरोकळ घरगुती कारणावरून वारंवार शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक, मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी नवरा मनोज कृष्णा शर्मा, सुरेखा कृष्णा शर्मा व मोन्या उर्फ प्रमेश कृष्णा वर्मा आदींवर कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आशाबाई राधाकिसन वंजारी (वय-45) प्रसादनगर शिर्डी यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे कोपरगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
आजच्या आधुनिक काळात हुंडा पद्धत नावाचा राक्षस सर्व दूर पसरले आहे. मागासलेल्या भारतीय समाजात हुंडा प्रथा आत्तापर्यंत विकराल रूपात आहे. हत्या देशात सुमारे दर एका तासात एक महिला हुंडा संबंधी कारणांनी मरण पावते आणि वर्ष 2007 ते 2011 च्या मध्ये या प्रकाराच्या प्रकरणात खूप वृद्धि झाली.राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे अपराध आंकड़े सांगतात की, विभिन्न राज्यातून वर्ष 2012 मध्ये हुंड्यासाठी हत्याचे 8,233 प्रकरण समोर आले होते.आंकड़े सांगतात की सुमारे प्रत्येक घंट्यात एक महिला हुंडाबळी चढ़ते. तरीही या गुन्ह्यात कमी येण्याची शक्यता नाही. अशा गुन्ह्यात दिवसानजीक वाढ होत असून, अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरात नुकतीच घडली आहे.या प्रकरणी नुकताच अंबिकानगर येथील महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यातील फिर्यादीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपली मुलगी नीता शर्मा हि सासरी असताना सासरकडील वरील आरोपीनी नऊ वर्षांपासून तिला माहेरकडून दुचाकी आणण्यासाठी वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली आहे.तिला शारिरीक मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी भेट दिली आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.515/2023 भा.द.वि.कलम 306,34 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश येसेकर हे करत आहेत.

COMMENTS