कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित अमोलक कॉलेज ऑफ फार्मसी (बी. फार्म) येथे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपू

कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित अमोलक कॉलेज ऑफ फार्मसी (बी. फार्म) येथे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. 2023 ते 2026 या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला हा समारंभ अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला.
यावेळी काजल सोनावळे, संकेत आगलावे आणि ज्ञानेश्वरी जावळे यांनी जीपॅट (जीपॅट) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयीन जीवनातील निरोप समारंभ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील भावनिक क्षण असतो. प्रवेशाच्या पहिल्या दिवसापासून ते अभ्यासक्रमाच्या अखेरच्या दिवसापर्यंतच्या असंख्य आठवणी, मित्र-मैत्रिणींसोबतचे सहवासाचे क्षण, अभ्यासासोबत केलेली मौजमजा, स्पर्धा आणि संघर्ष या सर्व आठवणींना उजाळा देताना अनेक विद्यार्थी भावुक झाले. व्यासपीठावर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाविषयीच्या हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या. यावेळी प्राचार्य डॉ. गफार सय्यद, उपप्राचार्य डॉ. संजय गर्जे, कार्यालयीन अधीक्षक मोहसीन पठाण, डॉ. शार्दुल भणगे, प्रा. महेश क्षीरसागर, प्रा. प्रशांत तांदळे, प्रा. मनिषा जगताप आणि प्रा. मिजबा तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी नीतिमत्ता, संघर्ष, कष्ट, प्रामाणिकपणा आणि व्यसनमुक्ती यांसारख्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना भविष्यासाठी प्रेरित केले. कार्यक्रमास प्रा. किरण वाघमारे, प्रा. राम धनवडे, प्रा. मानसी सोनवणे, प्रा. प्रतिक्षा बिरंगळ, प्रा. दिपाली शिंदे, प्रा. साक्षी भळगट, प्रा. अनुराधा पोकळे, अन्सार सय्यद, ऋषिकेश औंधकर, गणेश थोरवे, अमोल देसाई, अतुल जाधव, संजय शिरोळे आणि लखन शिरोळे यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम अल्पावधीत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनाचे आणि मेहनतीचे महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचार्यांकडून विशेष कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या नव्या जीवनप्रवासाला शुभेच्छा देत समारंभाचा समारोप करण्यात आला.

COMMENTS