Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परळीतील डायमंड फुटवेअर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान, अग्निशामक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

परळी शहरातील रेहाना नगर परिसरात असलेल्या डायमंड फुटवेअर कारखान्याला काल पहाटे सुमारे 3:15 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगी

अ.ब.क.ड. उपवर्गीकरण झालंच पाहिजे; न्यायासाठी बीडमध्ये मातंग समाजाचा विराट एल्गार – विनोद हातागळेलाभवंचित घटकांच्या हक्कांसाठी 16 जून रोजी ऐतिहासिक मातंग क्रांती मोर्चा; समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी घटनेनंतर महामार्गालगत विहिरींचा  प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर ! आतातरी प्राधिकरण आणि प्रशासनाला जाग येणार का?केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार – डॉ. गणेश ढवळे
युधाजित पंडित यांनी कैलास महाराज आनंदे यांची घेतली भेट; प्रकृतीची केली विचारपूस



परळी शहरातील रेहाना नगर परिसरात असलेल्या डायमंड फुटवेअर कारखान्याला काल पहाटे सुमारे 3:15 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कारखान्यातील मोठ्या प्रमाणावर कच्चा माल, मशिनरी तसेच चप्पलांचे तयार साठे जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कारखान्यात चप्पलांचे मोठे गोडाऊन असून त्यामध्ये पेपर बॉक्सचा मोठ्या प्रमाणावर साठा होता. त्यामुळे आग काही क्षणातच भडकली आणि संपूर्ण परिसरात पसरली. आगीच्या तीव्रतेमुळे कारखान्यातील यंत्रसामग्रीही पूर्णपणे नष्ट झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला कळविण्यात आले. मात्र, नेहमीप्रमाणे यावेळीही अग्निशामक दल घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अखेर आग आटोक्यात आणली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील एका रेझिन कापड दुकानालाही आग लागल्याची घटना घडली होती. त्या वेळीही अग्निशामक दल वेळेवर न पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. हा मुद्दा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही उपस्थित करण्यात आला होता. तरीदेखील पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आलेल्या अग्निशामक गाडीत पुरेसे पाणी नसल्याचे समोर आले. त्यामुळे स्थानिक नागरिकांना स्वतःच्या घरांमधून पाणी आणून गाडी चालू ठेवावी लागली. ही बाब अत्यंत धक्कादायक असून नगर परिषदेच्या अग्निशामक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. एकूणच, सलग घडणार्‍या अशा घटनांमुळे परळी नगर परिषदेच्या अग्निशामक व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा उघड झाल्या असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

COMMENTS