Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशभरात नव वर्षाच्या स्वागताचा उत्साह

राज्यात मंदिर, पर्यटनस्थळांवर गर्दी

नवी दिल्ली/मुंबई ः देशभरात नव्या वर्षाचे स्वागतांचा उत्साह ओसंडून वाहतांना दिसून येत होता. जून्या वर्षाला निरोप देतांना, नव्या वर्षाचे जल्लोषात स

अमेरिकेतील पश्चिम टेक्सासमधील फॅमिली डेअरी फार्ममध्ये  स्फोट
गर्भवती महिलेच्या मदतीसाठी अक्षय कुमार मैदानात | Akshay Kumar | फिल्मी मसाला | LokNews24
Dharur : बिअर शॉपी व्यावसायिकावर विनयभंगाचा गुन्हा नोंद (Video)

नवी दिल्ली/मुंबई ः देशभरात नव्या वर्षाचे स्वागतांचा उत्साह ओसंडून वाहतांना दिसून येत होता. जून्या वर्षाला निरोप देतांना, नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी अनेकांनी पर्यटन स्थळांना भेटी देणे पसंत केल्याचे चित्र शनिवारी संपूर्ण देशभर अनुभवाला मिळाले. नवी दिल्ली, चेन्नई, पंजाबसह देशभरातील सूर्यास्तांची चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचं सर्वात आधी स्वागत करण्यात आलेय. जोरदार रोषणाई, आतिषबाजी अन् उत्साहात लोकांनी 2023 चे स्वागत केले.

महाराष्ट्रात देखील शनिवार आणि रविवार सुटी असल्यामुळे अनेकांनी पर्यटन स्थळी, मंदिर, गड-किल्ल्यांवर भेटी देत नवे वर्ष साजरे करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. गोव्यात दोन वर्षांनंतर देशभरात निर्बंधमुक्त नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठया प्रमाणात गोव्यात दाखल झाले आहेत. मुंबईमध्ये पोलिसांनी मुंबईकरांना थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागत आणि साजरा करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण मुंबईचा समुद्रकिनाराचा आजूबाजू चा रस्त्यावर नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. अलिबाग, मुरुड येथील समुद्रकिनार्‍यांवर पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेट दिली आहे.

COMMENTS