श्रीगोंदा : भटकेविमुक्त आणि आदिवासी समाजाच्या मूलभूत प्रश्नांची कायमस्वरूपी सोडवणूक करायची असेल, तर समाजाने राजकीयदृष्ट्या सक्षम होऊन महाराष्ट्राच्या सत्तेत निर्णायक सहभाग मिळवणे आवश्यक आहे. यासाठी भटके-विमुक्त आणि आदिवासी समाजाने एकजूट होऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.भटकेविमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने संत कबीर जयंतीनिमित्त लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘मुशाफिरी यात्रा’ समारोप सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले की, ब्रिटिश सत्तेविरोधात संघर्ष करणाऱ्या भटके-विमुक्त समाजावर स्वातंत्र्यानंतरही अन्यायाची मालिका कायम राहिली आहे. स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण होत असतानाही या समाजातील अनेक कुटुंबांना राहण्यासाठी घर, शेतीसाठी जमीन, रेशनकार्ड, दर्जेदार शिक्षण व इतर मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने भटके-विमुक्त समाजाला सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्धार केला असून समाजाने संघटित होऊन या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांना साथ देण्याचेही आवाहन त्यांनी केले.प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही भटके-विमुक्त समाजातील अनेक कुटुंबे पालात राहण्यास मजबूर असल्याची खंत व्यक्त केली. दुसरीकडे सत्ताधारी महालात राहत असल्याची टीका करत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे समाजाला नवी दिशा मिळाली असल्याचे सांगितले. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीच्या माध्यमातूनच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.डॉ. अरुण जाधव यांनी घरगणना आणि जनगणनेत भटके-विमुक्त समाजाची योग्य नोंद होत नसल्याची खंत व्यक्त केली. ‘मुशाफिरी यात्रा’च्या माध्यमातून अनेक कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांच्या विविध समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम झाले आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सनदशीर आणि लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी अंबरसिंग चव्हाण, बाळासाहेब बळे, भालचंद्र सावंत, अनिल जाधव, संतोष चोळके, अनिल सावंत, लता सावंत, अनिल घनवट, संतोष जौंजाळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू ओहोळ यांनी, सूत्रसंचालन संतोष चव्हाण तर आभार उमा जाधव यांनी मानले.

COMMENTS