Homeताज्या बातम्याबीड

डॉ. प्रतिभाताई अशोकराव थोरात यांचा महायुतीत प्रवेश झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संपन्नकेजच्या विकासाला चालना देण्यासाठी महायुती म्हणून इनामदार व बनसोड यांच्या खंबीरपणे पाठीशी-डॉ. प्रतिभाताई

नुकताच डॉ. प्रतिभाताई अशोकराव थोरात यांनी शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश करून त्या महायुतीमध्ये सामील झाल्याबद्दल केज येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित द

नागरिकांनी जनगणना स्वतः करून घ्यावी-ब्राईट सोशल फाउंडेशनचे आवाहन
भुकेल्यांच्या ताटात माणुसकीचा घास!परळीमध्ये ग्लोबल विकास ट्रस्टच्या मोफत अन्नछत्र सेवेचा शुभारंभ
आचारसंहिता कालावधीतही बॅनरबाजीचा सुळसुळाट! डॉ. गणेश ढवळे यांच्या तक्रारीची दखल;  मुख्याधिकार्‍यांना केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश :- डॉ.गणेश ढवळे



नुकताच डॉ. प्रतिभाताई अशोकराव थोरात यांनी शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश करून त्या महायुतीमध्ये सामील झाल्याबद्दल केज येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जन विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
डॉ. प्रतिभाताई अशोक थोरात या केज येथे आल्या असता ज्येष्ठ नेते डॉ.हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड यांनी सत्काराचे आयोजन केले होते. या दरम्यान डॉ. प्रतिभाताई थोरात, नगराध्यक्षा डॉ. सौ. सीताताई बनसोड, ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांनी विविध विषयावर महत्वपूर्ण चर्चा केली. बोलताना डॉ. प्रतिभाताई थोरात म्हणाल्या की, केज शहराच्या विविध विकास कामासाठी व केजच्या विकासाला चालना देण्यासाठी आम्ही हारुणभाई इनामदार व सीताताई बनसोड यांच्या पाठीशी खंबीरपणे महायुती म्हणून उभा आहोत. यावेळी ज्येष्ठ नेते डॉ.हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड, गटनेते राजूभाई इनामदार, जीशान इनामदार, लकी ट्रेडर्सचे प्रमुख मुफशील शेख, सावळेश्वर चे सरपंच पिंटू मस्के यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS