रामटेक तालुक्यात सांड नदीमध्ये एक तरुण वाहून गेला

Homeताज्या बातम्या

रामटेक तालुक्यात सांड नदीमध्ये एक तरुण वाहून गेला

संजय नागपूरे असं या व्यक्तीचं नाव संजय ला वाचवण्यासाठी गेलेला तरुणही गेला वाहून

नागपूर प्रतिनिधी - नागपूरमधूनही सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात सांड नदीमध्ये एक तरुण वाहून गेला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने कैद्यांच्या पुनर्वसनाला नवी दिशा; टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस संस्थेशी सामंजस्य करार
मनीष सिसोदियांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी
वाद्य निर्मितीसाठी घोरपडीच्या कातडीचा वापर करणारा अटकेत

नागपूर प्रतिनिधी – नागपूरमधूनही सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात सांड नदीमध्ये एक तरुण वाहून गेला आहे. संजय नागपूरे असं या व्यक्तीचं नाव होतं. हा तरुण पुलावरुन पायी निघाला होता. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पायी रस्ता ओलांडताना तो प्रवाहासोबत वाहून गेला. संजय ला वाचवण्यासाठी एक तरुण मदतीला धावला. मात्र प्रवाह जास्त असल्याने तोही पाण्यासोबत वाहत जाऊ लागला. परंतु, पोहता येत असल्याने त्याने कसा तरी आपला जीव वाचवला. मात्र, संजयला वाचवण्यात तो अपयशी ठरला. सध्या संजयचा कोणताही पत्ता नसून स्थानिक आपल्या स्तरावर त्याचा शोध घेत आहे.

COMMENTS