Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाद्य निर्मितीसाठी घोरपडीच्या कातडीचा वापर करणारा अटकेत

मुंबई : वन विभागाने मालाड येथील कुंभारवाडा येथे शनिवारी धाड टाकून वाद्य निर्मितीसाठी वापरण्यात आलेली 117 घोरपडींची कातडी जप्त करण्यात आली. आरोपी

फलटण शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत; नगरपरिषदेच्या दारात महिलांचे आंदोलन
मुलांचे भविष्य आणि भवितव्य शिक्षक,पालकांच्या हाती-जयदत्त क्षीरसागर
इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात प्रवाशाचा मृत्यू

मुंबई : वन विभागाने मालाड येथील कुंभारवाडा येथे शनिवारी धाड टाकून वाद्य निर्मितीसाठी वापरण्यात आलेली 117 घोरपडींची कातडी जप्त करण्यात आली. आरोपी भगवान मांडळकार (72) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
मालाड येथील सोमवार बाजारमधील कुंभारवाडा येथे गैरप्रकार होत असल्याची माहिती ठाण्याचे उप वनसंरक्षक संतोष सस्ते यांना मिळाली. त्याआधारे शनिवारी कुंभारवाडा येथे धाड टाकण्यात आली. यावेळी आरोपी भगवान मांडळकर यांच्या राहत्या घरी व घराच्या आजूबाजूस वाद्य निर्मितीसाठी मातीच्या मडक्याला गुंडाळलेली आणि सुटी अशी एकूण 117 घोरपडीची कातडी आढळली. त्यामुळे मांडळकार यांच्यावर भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाण्याचे उप वनसंरक्षक संतोष सस्ते व सहाय्यक वनसंरक्षक गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत मुंबईचे वनक्षेत्रपाल राकेश भोईर, अंधेरीचे वनपाल रोशन शिंदे, गोरेगाव वनरक्षक सुरेंद्र पाटील, भांडुपचे वनरक्षक मनिषा महाले, टेल्स ऑफ होप अ‍ॅनिमल रेस्क्यू फाउंडेशनचे अक्षय चंद्रन व गणेश दाभाडे सहभागी झाले होते. दरम्यान, मांडळकार हे अवैधरित्या घोरपडीची कातडी खरेदी करून वाद्य तयार करण्यासाठी वापरत असत. त्यामुळे घोरपडीची हत्या करून कातडीची विक्री करणार्‍यांचा शोध वन विभागाकडून सुरू आहे.

COMMENTS