Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात वायरचा धक्का लागल्याने तरूणाचा मृत्यू

पुणे : पुण्यातील वडगाव शेरी येथे धक्कादाक घटना घडली आहे. पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डिजेवर चढून झेंडा फडकवत असतांना हाय टेन्श

कंत्राटी नोकर्‍यांमध्येही मिळणार आरक्षण
खासदार लोखंडे भ्रष्टाचारात ‘अव्वल’ ; अनुदान लाटण्यात ‘पटाईत’
अखेर बच्चू कडू यांनी सोडला मंत्रिपदावरचा दावा

पुणे : पुण्यातील वडगाव शेरी येथे धक्कादाक घटना घडली आहे. पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डिजेवर चढून झेंडा फडकवत असतांना हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्याने एका तरुणाचा भाजून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या घटनेत आणखी तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. या घटनेमुळे येथील मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभय वाघमारे (वय 17) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. सकाळी 10 च्या सुमारास वडगाव शेरी येथील भाजी मंडई परिसरात पैगंबर जयंती निमित्त मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. ही मिरवणूक वडगाव शेरी भाजी मंडई परिसरात आली. यावेळी अभय वाघमारे व त्याचे काही मित्र डिजे असलेल्या ट्रक्टरवर बसले होते. ट्रॅक्टरवर उभे राहून हे तरुण झेंडा फडकवत होते. यावेळी अचानक वर असलेल्या हाय टेंशन वायरला झेंड्याचा लोखंडी रॉड लागला. यामुळे त्यातून वीजप्रवाह उतरून या तरुणाच्या शरीरात शिरला. यामुळे हा तरुण अक्षरक्ष: जळाला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

COMMENTS