Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिडेंविरोधात एफआरआयसाठी विलंब का ?

न्यायालयाचे मुंबई पोलिसांवर ताशेरे

मुंबई ः शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडेंविरोधात एफआयआर दाखल करण्यास विलंब का लागला? अशा कडक शब्दात न्यायालयाने पोलिसां

अभियांत्रिकी विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या
राज्यात राज्यपाल बदलाचे वारे
चाकूरकरांच्या सून आज करणार भाजपमध्ये प्रवेश

मुंबई ः शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडेंविरोधात एफआयआर दाखल करण्यास विलंब का लागला? अशा कडक शब्दात न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे आढले आहेत. तसेच या प्रकरणात मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी चौकशी करावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात अ‍ॅड. अमित कटारनवरे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत आक्षेपार्ह वक्तव्ये होऊनही भिडेंविरोधात गुन्हा दाखल का करत नाही? अशी विचारणा करण्यात आली होती.
 अ‍ॅड. कटारनवरे यांनी भिडेंविरोधात दाखल केलेल्या या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांवर कठोर ताशेर ओढले आहे. आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरही संभाजी भिडे यांच्या विरोधात एफआयआर नोंदवून घेण्यास एवढा विलंब का लागला ? असा सवाल पनवेल सत्र न्यायालयाकडून नवी मुंबई पोलिसांना विचारण्यात आला आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिस अधिकार्‍यांवर ताशेरे आढेच पण त्याच बरोबर शासनाला महत्त्वाचे निर्देश देखील दिले आहेत. या प्रकरणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच अ‍ॅट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गत भिडे यांच्यावर एफआयआर दाखल करण्यास झालेल्या विलंबामागील कारणांची प्रशासकीय स्तरावर चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीबद्दल आक्षेपार्ह विधाने केले होते. ते विधान सोशल मीडियावर अमित कटारनवरे यांच्या निदर्शनास आले होते. यानंतर त्यांनी काही व्हिडीओ क्लिप्सचा दाखला देत कटारनवरे यांनी 28 जुलै रोजी नवी मुंबई पोलिसांत धाव घेतली होती.

COMMENTS