Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

तामिळनाडूत फटाका कारखान्यात भीषण स्फोटात 16 कामगारांचा मृत्यू

विरुधुनगर : तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात एका फटाका निर्मिती कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार,

लखनऊमध्ये आगीचे तांडव! २० हून अधिक सिलेंडरचे स्फोट आणि शेकडो संसार खाक
एसी ब्लास्टमुळे लागलेल्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू; गच्चीचा बंद दरवाजा ठरला मृत्यूचा सापळा!
गॅस सिलिंडरच्या स्फोटात महिलेचा मृत्यूछत्रपती संभाजीनगरातील घटना ; नऊ जणांचा वाचले प्राण
तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, इमारत कोसळली; स्फोटाचा  आवाजाने आजूबाजूचा परिसर हादरला | Saamana (सामना)

विरुधुनगर : तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात एका फटाका निर्मिती कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचे मृतदेह ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही अनेक कामगार मलब्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट कट्टनारपट्टी भागातील फटाका युनिटमध्ये झाला. आगीने काही वेळातच शेजारील चार युनिटलाही आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटाच्या धक्क्याने परिसरातील इमारतींचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्ती निवारण पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. बचावकार्य युध्दपातळीवर सुरू आहे. संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा घातला आहे.

COMMENTS