Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रातील पर्यटन 1 जानेवारी दरम्यान बंद

पाटण / प्रतिनिधी : कोयना भागातील सदाहरित व जैवविविधतेने नटलेल्या जंगलात निसर्गप्रेमी व हौशी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. मात्र, नववर्षाच्या स्वागता

केज-मांजरसुंबा महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक;पाच जण जखमी
विकास कामांमुळे कॉलर उडविणार्‍यांचा लोकसभेला पराभव : सारंग पाटील
खा. शरद पवार साहेब यांच्या घरावरील हल्ल्याचा पाटणमध्ये निषेध

पाटण / प्रतिनिधी : कोयना भागातील सदाहरित व जैवविविधतेने नटलेल्या जंगलात निसर्गप्रेमी व हौशी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. मात्र, नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर होणारी संभाव्य गर्दी, अनुचित प्रकार व सुरक्षेच्या कारणास्तव सह्याद्री व्याघ्र राखीव अंतर्गत येणार्‍या कोयना व हेळवाक वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे दि. 1 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल अक्षय साळुंखे व अर्शद मुलाणी यांनी दिली.
वन्यजीव विभागाच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या पत्रकानुसार, नववर्षाच्या स्वागतासाठी काही पर्यटक विनापरवाना वनक्षेत्रात प्रवेश करून चूल मांडून जेवण करणे, मद्यपान, गोंधळ घालणे, वनवणवे लावणे अथवा शिकार करणे अशा अनुचित प्रकारांची शक्यता लक्षात घेता दि, 31 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत विशेषतः पर्यटण प्रवेश पूर्णतः बंद राहणार आहे. कोणताही अवैध प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम व वन अधिनियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.
या कालावधीत वनक्षेत्राकडे येणार्‍या प्रमुख रस्त्यांवर चेकपोस्ट उभारून वाहतूक नियमन, ठिकठिकाणी नाकेबंदी तसेच रात्रगस्त ठेवण्यात येणार आहे. वनपाल व वनरक्षकांनी नियतक्षेत्रात गस्त घालून जिओ-टॅग फोटोसह अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वनविभागाच्या या निर्णयामुळे पर्यटक व नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वन्यजीव विभागाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS