Homeताज्या बातम्याविदेश

जपानमध्ये धडकले शक्तिशाली वादळ

टोकियो ः जपानमध्ये यावर्षीचे सर्वात शक्तिशाली वादळ ’शानशान’ धडकले आहे. शानशान गुरुवारी सकाळी 8 वाजता दक्षिण-पश्‍चिम क्यूशू बेटावर पोहोचले. वादळाम

ऑलम्पिक स्पर्धेसाठी खेळाचा ध्यास घेणे गरजेचे
सायंकाळच्या लोडशेडिंगच्या वेळेत बदल करा; खा. लंके यांची अधीक्षक अभियंत्यांकडे मागणी
मुंबई महापालिकेच्या 122 अभियंत्यांच्या बदल्या अखेर रद्द

टोकियो ः जपानमध्ये यावर्षीचे सर्वात शक्तिशाली वादळ ’शानशान’ धडकले आहे. शानशान गुरुवारी सकाळी 8 वाजता दक्षिण-पश्‍चिम क्यूशू बेटावर पोहोचले. वादळामुळे ताशी 252 किमी वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. वादळामुळे अनेक भागांत मोठे नुकसान झाले आहे. जपानमधील टायफून क्रमांक 10 म्हणून ओळखल्या जाणार्‍या शानशानने 250,000 हून अधिक घरांची वीज खंडित केली आहे. गामागोरी येथे भूस्खलनाने एक घर गाडले आणि एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 2 जण जखमी झाले आहेत.

COMMENTS