Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात ’शिवशक्ती-भीमशक्ती’ची घोषणा

प्रा. जोगेंद्र कवाडे गटाची शिंदे गटासोबत युती

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात एकीकडे शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची घोषणा होत असतांनाच, बुधवारी मात्र प्रा. जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिक पा

मतदार यादीतून हटवली 1.66 कोटी नावे
पदोन्नतीतील आरक्षणासाठी आरपीआयचा आंदोलन सप्ताह
भरधाव कार ट्रकवर आदळून दोन जण ठार

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात एकीकडे शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची घोषणा होत असतांनाच, बुधवारी मात्र प्रा. जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिक पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांनी युती केल्याची घोषणा केली. यावेळी बोलतांना प्रा. कवाडे म्हणाले की, राज्याला धाडसी मुख्यमंत्री लाभला आहे, असे म्हणत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी बाळासाहेबांच्या सुतीसोबत युती केल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री शिंदेवर आमचा विश्‍वास आहे, असे वक्तव्य कवाडे यांनी केले आहे.
बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांची संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. या निमित्ताने शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे. पत्रकार परिषदेचे आयोजन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे हे अधिकृतरित्या युतीची घोषणा केली आहे. ांबेडकरी चळवळीमधील नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे आणि कवाडे युतीच्या चर्चा सुरू झाल्या, दोन दिवसांपूर्वी झालेल्या तासभराच्या चर्चेनंतर आता दोघांची एकत्र पत्रकार परिषद असल्याने हा महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे. गेली अनेक दिवस उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये युती होणार असे सांगण्यात येत आहे. याच पार्श्‍वभूमीवर जोगेंद्र कवाडे यांनी घेतलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट ही राज्यातील नव्या समीकरणाची नांदी म्हणता येऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दलित पँथरनंतर आता जोगेंद्र कवाडे यांच्यात झालेल्या तासभराच्या चर्चेमुळे एकनाथ शिंदे यांचा ठाकरे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यात जवळपास 1 तास चर्चा झाली. यानंतर कवाडे यांनी शिंदेंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. यामुळे एकेकाळी मविआत असलेले कवाडे आता शिंदे-फडणवीस यांच्यासोबत दिसणार की काय असा सवाल राजकीय वर्तुळात अनेकांना पडला आहे. गेली अनेक दिवस जोगेंद्र कवाडे हे मविआवर नाराज होते. मविआ सरकार मित्रपक्षांना विसरले असा आरोपही त्यांनी केला होता.

COMMENTS