Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंजाब नॅशनल बँकेत 2434 कोटींचा कर्ज घोटाळा

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने शुक्रवारी स्टॉक एक्सचेंजला मोठी माहिती दिली आहे. 26 डिसेंबरला बाजार बंद झाल्यानंतर बँकेने एका रिपोर्टमध्ये बँकेत 2434

महाविकास आघाडीची विकास पताका घेऊन धावल्या कोयना-महाराष्ट्र एक्सप्रेस
विद्यार्थिनींना एसटीकडून शाळेतच पास वाटपाचे नियोजन
एसटीच्या कर्मचार्‍यांच्या संपाला गालबोट; सुर्ली घाटात आटपाडी-कराड बसवर दगडफेक

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने शुक्रवारी स्टॉक एक्सचेंजला मोठी माहिती दिली आहे. 26 डिसेंबरला बाजार बंद झाल्यानंतर बँकेने एका रिपोर्टमध्ये बँकेत 2434 कोटींचा कर्ज घोटाळा झाल्याची माहिती दिली आहे. बँकेने एसआरईआय ग्रुपच्या दोन संस्थांच्या माजी प्रमोटर्स संबंधांतील 2434 कोटींच्या कर्ज घोटाळ्याची माहिती दिली.

बँकेने सांगितले की त्यांनी एसआरईआय इक्विपमेंट फायनान्स लिमिटेडच्या खात्यात 1240.94 कोटी रुपये आणि एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेडच्या खात्यात 1193.06 कोटींच्या फसवणुकीचा शोध घेतला आहे. पंजाब नॅशनल बँकेने हेदेखील स्पष्ट केले की वितरित रकमेसाठी पहिल्यापासून 100 टक्केतरतूद करुन ठेवली आहे.
फायलिंगमध्ये बँकेनं म्हटलं की या कंपन्यांनी छउङढ द्वारे कॉर्पोरेट दिवाळखोरी तडजोड प्रक्रियेद्वारे यशस्वीपणे मार्ग काढला आहे.
पंजाब नॅशनल बँकेचा शेअर शुक्रवारी 60 पैशांच्या घसरणीसह 120.35 रुपयांवर बंद झाला होता. दीर्घकाळाचा विचार केला असता बँकेचा शेअर मजबूत स्थितीत आहे. गेल्या सहा महिन्यात बँकेचा शेअर 13 टक्क्यांनी वाढला आहे. 2025 मध्ये बँकेच्या शेअरमध्ये 17 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत पंजाब नॅशनल बँकेने त्यांचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 14 टक्के वाढ नोंदवली होती. बँकेने निव्वळ नफा 4904 कोटी रुपये कमावला होता.

COMMENTS