Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कला पथकाच्या माध्यमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत

सातारा / प्रतिनिधी : राज्य शासन नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना योजनांची माहिती व्हावी यासाठी जिल्हा म

आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत पृथ्वी बर्वेचा डबल धमाका
एकरकमी एफआरपीसाठी कारखान्यावर मोटसायकल रॅली
साकुर्डीत वीज कोसळल्याने ट्रान्सफर्मरसह पिंपळाचे झाड जळाले

सातारा / प्रतिनिधी : राज्य शासन नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना योजनांची माहिती व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कलापथकांमार्फत विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. ग्रामीण भागात होणार्‍या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
राज्य शासनाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षात शासनाने लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या योजनांचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. त्यांना योजना सोप्या व सहज भाषेत समजावे म्हणून लोककलेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शासनाच्या योजनांची लोककलेच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे.
त्रिरत्न सांस्कृतिक कला व सामाजिक संस्था कलापथकांच्यावतीने सातारा येथे तर लोकरंगमंच, सातारा यांच्या कला पथकाने खंडाळा तालुक्यातील नायगाव, भादे, बावडा वाई तालुक्यातील बावधन पाचवड येथील नागरिकांना कला पथकाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. लोककलेच्या माध्यमातून आम्हाला शासन राबवित असलेल्या योजनांची आम्हाला समजेल, अशा भाषेत सांगितले जात आहे. आम्हाला आमच्यासाठी कोणत्या योजना आहेत, त्या समजल्या. आमच्यासाठी असणार्‍या शासनाच्या योजनांचा लाभ घेणार असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामीण भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या.

COMMENTS