Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित दादा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी लालबागच्या राजाच्या चरणी कार्यकर्त्याकडून चिठ्ठी..

मुंबई प्रतिनिधी - अजित पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी रणजीत नरोटे यां

 कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र काय असा-तसा वाटला का ? 
अशोकनगर येथे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अजित पवारांसोबत गेलेल्यांना परत पक्षात घेऊ नका

मुंबई प्रतिनिधी – अजित पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी रणजीत नरोटे यांनी लालबागच्या राजाच्या चरणी एक चिठ्ठी अर्पण केली. या चिठ्ठीची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. या चिठ्ठीमध्ये “हे लालबागच्या राजा, आमचे अजितदादा पवार लवकरात लवकर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे”, असं लिहिलं होतं. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशा आशयाचे बॅनर्स ठिकठिकाणी लागले होते. अनेकांनी गणपतीच्या देखाव्यातून अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती

COMMENTS