Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी होणार साडेतीनशे रुपयांत : आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई / प्रतिनिधी : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणार्‍या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी करण

तडीपार आदेशाचा भंग करणार्‍या गुंडास अटक
बाल हत्याकांडातील गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द; मरेपर्यंत जन्मठेप
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अटक होणार? शिराळा न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट

मुंबई / प्रतिनिधी : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणार्‍या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी करण्यात येणार्‍या आरटीपीसीआर चाचणीसाठी 350 रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाकडून खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणार्‍या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्‍चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा केली आहे. आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 350 रुपयांत चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे टोपे यांनी सांगितले. या शासन निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी 350, 500 आणि 700 रुपये दर निश्‍चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून 350 रुपये आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी 500 रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी 700 रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
आरटीपीसीआर चाचणीसोबत रॅपीड अ‍ॅटीजेन, अ‍ॅटीबॉडी या चाचण्यांसाठी दर निश्‍चित करण्यात आले आहे. अ‍ॅटीबॉडीज चाचण्यांसाठी 200, 250 आणि 350 असे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अ‍ॅटीबॉडी या चाचणीसाठी 300, 400, 500 असे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. रॅपीड अ‍ॅटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 100, 150 आणि 250 असे दर आता निश्‍चित करण्यात आले आहेत. सीबी-नैट अथवा ट्रूनैट चाचणीसाठी 1200 रुपये निश्‍चित करण्यात आले आहेत. राज्यात आयसीएमआर व एनएबीएलने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ झाल्याने चाचण्यांचे दर कमी होणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.

COMMENTS