Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात झिकाचा पहिला रुग्ण आढळला

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात एका 64 वर्षीय महिलेला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. संबंधीत महिलेने पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या एक

वाढते अपघात चिंताजनक…
जयवंतराव भोसले पतसंस्थेची 395 कोटींची व्यवसायपूर्ती : डॉ. अतुल भोसले
स्वच्छता सर्वेक्षणात नगर राज्यात दुसरे व देशात 32 वे

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात एका 64 वर्षीय महिलेला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. संबंधीत महिलेने पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या एका सांस्कृतिक कार्यकमाला हजेरी लावली होती. त्यानंतर तिला ताप आल्याने या संसर्गाला पिंपरी-चिंचवडचे कनेक्शन तर नाही याचा आता तपास घेतला जात आहे. तसेच संबंधित महिला ही काही दिवसांपुर्वी केरळला गेल्याचेही समोर आले आहे. शहरात झिका आजाराचा यंदा पहिला रुग्ण आढळला आहे.
काही दिवसांपूर्वी पिंपरी- चिंचवडमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता. त्याला या महिलेने हजेरी लावली होती. त्यानंतर तिला ताप आला आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला. तिला पुण्यातील खासगी रुणालयात दाखल करण्यात आले. तिच्या तपासणीत अखेर झिकाचे निदान झाले. दरम्यान, पिंपरी- चिंचवडमधील सांस्कृतिक कार्यक्रमाला केरळमधील अनेक जण उपस्थित होते. त्यातील एखाद्या बाधित व्यक्तीकडून या महिलेला संसर्ग झाला असू शकतो, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी प्रतिक नगर येरवडा येथे प्रत्यक्ष रुग्णाची भेट घेतली. रुग्णाची विचारपूस करून तब्येतीची काळजी घेण्यास सांगण्यात आले. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेच्या कर्मचार्‍यांना झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे आदेश देण्यात आले.

COMMENTS